Sunday, May 26, 2024
Homeभविष्यवेधभविष्यवेध : त्रैमासिक भविष्य – मेष

भविष्यवेध : त्रैमासिक भविष्य – मेष

जानेवारी -2020 

ग्रहस्थिती – महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी हर्शल तृतीयात राहू, अष्टमात मंगळ , नवमात रवि-बुध, लाभात शुक्र-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे चू, चे,चो, ला,ली,लू,लू,लो आ अशी आहेत. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी मंगळ आहे. तत्व अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव अतिशय चंचल आहे. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, वर्ण- क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल डोक्यावर असल्याने डोक्याला इजा होऊ नये ही काळजी घ्या. शुभ रंग लाल. शुभ रत्न पोवळे. शुभ दिवस- मंगळवार, रविवार. देवता शिव, भैरव, मारूती. शुभ अंक 9, शुभ तारखा 9/18/27. मित्र राशी-सिंह,तुला,धनु. शत्रु राशी- मिथून, कन्या, स्वभाव अत्यंत क्रोधी, कुटूंबाचे उत्तम प्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.

तनुस्थानी हर्षल आहे. धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल एवढेच नाही तर इतरांना विचीत्र वाटेल असा राहील. भाषणातून राजकारणात असाल तर भाषणातून श्रोत्यांवर आश्वासनांचा कृत्रिम पाऊस पाडाल. मात्र अनुयायी किंवा श्रोतागण त्यावर विश्वास ठेवतील असे नाही. स्वतःला कितीही फिलगुड वाटेल तरी इतरांना तसे वाटेल असे नाही. लोकाचार व रूढी यांच्याविरूद्ध वर्तन ठेवण्यात भूषण वाटेल. स्वभाव क्षणात शांत तर क्षणात उच्छुंखल असा राहील.

स्त्रियांसाठी – पती-पत्नीचे आपसात प्रेम चांगले राहील. शत्रुसमान नातेवाईकांना गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. काटकसर करावी.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता व राहीन. त्यामुळे वार्षिक परीक्षा देणे जास्त  अवघड जाणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव जेवढा जास्त कराल तेवढी टक्केवारी वाढेन.

शुभ तारखा – 2,  5, 8, 9, 12, 14, 15, 18, 20, 25, 26, 28, 30, 31

फेब्रुवारी – 2020 

ग्रहस्थिती – महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी

हर्शल, तृतीयात राहू, नवमात मंगळ, नवमात मंगळ,गुरू, केतू,प्लूटो, दशमात रवि-शनि लाभात बुध-नेपच्यून, व्ययात शुक्र अधी ग्रहस्थिती आहे.

दशमस्थानातील रविमुळे खात्रीने महत्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना यांची जास्त प्रचिती येईल. निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ता अथवा पुढारी विशेष प्रचार कार्य करण्यात चांगले यश मिळेल. साधारणपणे म्हटले जाते की अलीकडच्या काळात पिता-पुत्राचे पटत नाही. परंतू तुम्हाला पितृसुख उत्तम मिळेल.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावळा राहील. शंकराची उपासना केल्यास दोषांवर नियंत्रण होऊ शकेल. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीची विचारणा होण्याची शक्यता आहे. लाभात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू साध्य होतील. शत्रुंंना गोड बोलून वश कराल. संगीताची फार आवड असेल. सभासंमेंलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीसाठी एकादशातील बुध फार चांगला समजला जातो. अध्यात्मिक उन्नतीसाठी साध्य करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापक यांचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्राची आवड असल्यास प्रगती होईल.

स्त्रियांसाठी -द्वादशाम शुक्र आहे. महिलांसाठी म्हटले तर चांगला व वाईट दोन्हीही. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला तर मार्गापासून विचलीत होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक ठरेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात अधिक प्रगती होईल. आळस मात्र टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा – 2, 4, 6, 7, 9, 12, 13, 16, 19, 24, 25, 26, 29

मार्च  – 2020 

ग्रहस्थिती –  महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शूक्र, हर्शल, तृतीयात राहू, नवमात मंगळ, गुरू, केतू, प्लूटो दशमात शनि लाभात रवि-बुध-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात राहू आहे. आतापर्यंत भांबावून टाकणर्‍या समस्यांना उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंखी वाढती संख्या तुमच्या यशाचा चढता आलेय आहे. हे सर्व नष्ट होतील. शास्त्रसंशोधनात तत्संबंधित लोकांना यश मिळेल.सौख्य आणि विकास उपभोगावयास मिळेल. मोठ्या उलाढालींमुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरवर्गाला पदोन्नतीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. शेतकर्‍यांना पशूधनापासून लाभ होतील. राहूच्यासमोर आसणारा केतू भाग्यस्थानी विराजमान आहे. राहू केतूच्या अस्तित्वात नसतांना न दिसणार्‍या हवेप्रमाणे मानवी जीवनावर बरे वाईट परिणाम करतात. नावेची प्रगतीपथाकडे गतीत वृद्धी करील. मात्र त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे. अन्य नौका वादळात सापडेल. दशमात शनी आहे. भाग्यवृदधी होईल. राजाप्रमाणे सुख उपभोगाल. आपल्या क्षेत्रात थोर अधिकार मिळतील. शेतकर्‍यांना शेतीपासून लाभ होईल. स्वपराक्रमाने उदयास याल. उद्योगशीलता उत्तम राहील. नम्रतेमुळे लोकप्रियतेत वाढ होईल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. महिलांसाठी सौंदर्यवर्धक, सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतीकारक तर आहेच शिवाय हौस, मौल करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ  व टी.व्ही. कडे लक्ष न देणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 11, 19

- Advertisment -

ताज्या बातम्या