Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधरवीरेषेने प्रदान केली किर्ती !

रवीरेषेने प्रदान केली किर्ती !

प्रफुुुल्ल कुलकर्णी-ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड 8888747274

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा जन्म 30 ऑगस्ट 1954 रोजी पाटणा बिहार येथे झाला. त्यांचे वडील श्री. ठाकूर प्रसाद पाटणा उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील होते. ते जनसंघाचे संस्थापक सदस्य होते.

- Advertisement -

नंतर भारतीय जनता पार्टीशी निगडित होते. रविशंकर यांनी एम.ए., एल.एल.बी.ची पदवी पाटणा विद्यापीठातून मिळवली. 1980 मध्ये त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. दिल्ली उच्च न्यायालयात सन 2000 पासून वकिली सुरू केली. सर्वोच्च नायालयात राम जन्मभूमी न्यासाचे व नर्मदा आंदोलन बचावप्रकरणात ते वकील होते.

त्यांची राजकीय कारकीर्द 1970 पासूनच इंदिरा गांधी यांचे सरकारच्या विरोधात निषेध नोंदविण्यापासून चालू झाली. पुढे आणीबाणीच्या काळात त्यांना कैद झाली. जयप्रकाश नारायण व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय होते. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय झाले. विद्यार्थीदशेत पाटणा विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे जनरल सेक्रेटरी होते.

ना.रविशंकर प्रसान यांचा राजकीय प्रवास ऑगस्ट 1995 मध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य झाले. 1996 मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात चारा घोटाळ्याची जनहित याचिका पाटणा उच्च न्यायालयात दाखल केली. एप्रिल 2000 मध्ये राज्यसभेत निवड झाली. जून 2001 ला भाजपच्या राष्ट्रीय कायदेविषयक संघटनेत निवड झाली. सप्टेंबर 2001 ला केंद्रीय खाण व कोळसा राज्यमंत्री पदावर होते.

जुलै 2002 ला कायदा व न्यायमंत्री पदावर होते. ऑगस्ट 2005 रोजी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती झाली. मार्च 2006 ला पुन्हा राज्यसभेवर निवड झाली. त्या वेळेस राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञानच्या स्थायी समितीचे सदस्य होते. ऑक्टोबर 2009 साली घटनात्मक आणि संसदीय अभ्यास संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते.

एप्रिल 2010 मध्ये भाजपचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते होते. मार्च 2011 टेलिकॉम परवाने व स्पेक्ट्रमच्या वाटप व किंमतीशी संबंधित बाबींची तपासणी करण्यासाठी सदस्य, संयुक्त संसदीय समिती सदस्य होते. एप्रिल 2018 मध्ये चौथ्यांदा राज्यसभेवर निवड झाली. 2019 मध्ये ते लोकसभेत निवडून गेले. मे 2019 मध्ये देशाचे कायदा आणि न्याय मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री झाले. दळणवळण मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली.

रविशंकर प्रसाद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेच्या वेळी संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जुलै 2016 मध्ये या मंत्रालयाने दळणवळण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे विभाजन केले. या विभाजनानंतर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय राहिले.

डिजिटल इंडियाला भारतातील सामान्य नागरिकांच्या सबलीकरणासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम बनविण्यासाठी त्यांनी मंत्री म्हणून प्रयत्न केले. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सामान्य सेवा केंद्रांच्या स्थापनेत महत्त्वाची भुमिका बजावली.

ही केंद्रे खेड्यांमध्ये डिजिटल सर्व्हिस डिलिव्हरी कियोस्क आणि लोकांच्या सर्व डिजिटल सेवांसाठी वन स्टॉप शॉप म्हणून विकसित केली गेली. रेल्वेचे तिकिट बुकिंग, पॅन अर्ज, आधार नोंदणी, डिजिटल स्किलिंग, आयुष्मान भारत कार्ड, युटिलिटी बिले भरणे, बँकिंग आणि विमा सेवा इत्यादी सेवा या कियोस्कच्या माध्यमातून देण्यात आल्या. सध्याच्या कोविड महामारीच्या काळात डिजिटल व्यवहारांचा खूप मोठा उपयोग होत आहे.

हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे संचित, कर्म व भाग्याचे कारकत्व

हस्तसामुद्रिकशास्त्रात डावा हात संचिताचा असतो व उजवा हात हा कर्माचा असतो. संचित उत्तम असल्याशिवाय कर्माचा म्हणजे उजवा हात हा शुभ असत नाही. पूर्व जन्मीचे पुण्य असल्याशिवाय मनुष्य प्रगती करीत नाही. संचिताचा हात हा उजव्या हाताचा प्रेरणादायी हात असतो, कर्म करण्यास संचित उद्युक्त करते व प्रत्येक कृतीत यश प्राप्त होते व जीवनात यश प्राप्तीसाठी झगडावे लागत नाही. वारंवार अडथळे येत नाहीत. हात लावील तेथे सोने होते. त्यामुळे मनुष्य हरघडी प्रगती करीत असतो, प्रगतीपथावर राहतो.

मात्र ज्या व्यक्तीला जीवनात वारंवार अडथळे येतात, प्रयत्नांना यश मिळत नाही कायम अपयश पाहावे लागते, नशीब साथ देत नाही, अक्कल हुशारी असूनही पदरी निराशा येते अश्या व्यक्तींचे संचित शुभ वा प्रभावी नसते. कर्माच्या म्हणजेच ज्या हाताने व्यक्ती हाताने काम करते तो उजवा असो अथवा डावा तो कर्माचा हात असतो व कर्माच्या हातावर आयुष्यात येणारे यश अपयश, अडथळे ह्यांची स्पष्टपणे नोंद असते.

या यशापयशाच्या गोष्टी पहाण्यासाठी दोनही हाताचे परीक्षण करताना व्यक्तीचे संचित किती शुभकारक आहे, तसेच उजव्या हातावरच्या कर्माच्या हातावरील कर्म किती शुभ अशुभ आहे, याचा लेखा-जोखा ग्रह, रेषा व चिन्हे किती शुभ अशुभ आहे ते त्यांच्या शुभ अशुभ कारकत्वानुसार संपूर्ण जीवनाचा आराखडा हातावर अंकित असतो. तो फक्त आपल्याला वाचता आला पाहिजे. त्यासाठी हस्त सामुद्रिक शास्त्रात काही अतिशय शुभदायी कारकत्व असलेल्या रेषा, चिन्हे व ग्रह यांचे एकत्रित संपूर्ण आयुष्याचे भाकीत सखोलपणे वाचता येते काढता येते व भविष्याचा निर्णय करता येतो.

रविशंकर प्रसाद यांच्या हातावरील सर्व ग्रह शुभ आहेत. त्यातच रवी व गुरु ग्रह उच्चीचे आहेत. आयुष्य रेषेतून मनगटाचे जवळून उगम पावणारी भाग्य रेषा अतिशय शुभत्व प्रदान करणारी तसेच रवी व बुध बोटाच्यामध्ये गेलेली रवी रेषा मान सन्मान व आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारी आहे.

मस्तक रेषेच्या शेवटी दोन फाटे आहेत ते आत्यंतिक बौद्धिक क्षमता वाढवणारे, अंगठ्यावरील यव चिन्ह ऐश्वर्य देणारे. हाताचा पंजा व अंगठा मजबूत, त्यामुळे तत्त्त्ववादी, द़ृढनिश्चयी, हाताच्या पंजापेक्षा बोटे लांबीला छोटी त्यामुळे जलद निर्णय क्षमता आहे.

हातावर आडव्या-तिडव्या रेषा नाहीत. अशुभ चिन्ह नाहीत. बोटांची पेरे प्रमाणात, ग्रहावरील बोटे सरळ, टोकाला गोलाईयुक्त यामुळे गुरु, शनी, रवी व बुध ग्रहाला शुभत्व प्राप्त झालेले व कुठलाही गोष्टींची चिकित्सा करताना योग्य मूल्यमापन व अचूक निदान व निर्णय क्षमता आहे.

हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे ना.रविशंकर यांचा हातावर परमेश्वराने प्रदान केलेले शुभत्व व उत्तम फलदायी प्रेरणेने व प्रयत्नाने केलेले कर्म व शुभ संचिताने मिळालेले यश व कर्माच्या हाताने दिलेली प्रेरणा त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप मोठ्या उंचीवर घेवून गेली. जनहितासाठी अधिकाधिक उत्तम कार्य आगामी काळात त्यांच्या हातून होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या