Tuesday, November 26, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope

साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक – (ठाणे, मुंबई) 9869575547

मेष – गृहक्लेशावर सार्वमताने तोडगा निघेल

- Advertisement -

आपण या आठवड्यात धडाडीचे निर्णय घ्याल. व्यवसायात ठोक गणित मांडण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांसाठी अत्यंत समाधानकारक वातावरण बनून राहील. गृहक्लेशावर सार्वमताने तोडगा निघू शकेल. नवनाथ ग्रंथातील 5 अध्याय पठण करावा. व्यावसायिक वास्तू खरेदी करण्याकडे कल राहील. वडिलोपार्जित स्थावर इस्टेट मिळू शकेल. मनासारख्या घटना घडतील. शुभ तारखा : 8,9,10,13,14

वृषभ – नोकरीत पदोन्नती मिळू शकेल

मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली कराल. अडकून पडलेले येणे वसूल होईल. नेत्रविकाराने त्रस्त व्हाल. छोटीमोठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकेल. नोकरांकडून काम करून घेताना सौजन्याने घ्यावे. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे लोक भेटतील. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचार करणे गरजेचे वाटते. शुभ तारखा : 11 ते 14

मिथुन – चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील

केलेले संकल्प सिद्धीस जाण्यासाठी अनुकूल काळ आहे. सामाजिक क्षेत्रात सानुकूल वातावरण तयार होईल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दूरगामी परिणामाचा विचार करून नियोजन कराल. कोर्ट कचेरीची पायरी चढू नका. कायदेविषयक अडचणी वाढू शकतील. चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील. भागीदाराकडून विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल. वाहन खरेदीबाबत विचार तूर्तास पुढे ढकलण्याचा करावा. शुभ तारखा : 8 ते 14

कर्क- व्यवहार चातुर्य राखणे

आपमतलबी लोकांकडून नाहक अडकवले जाऊ शकाल. व्यवहार चातुर्य राखणे अनिवार्य असेल. अचानक खर्च उद्भवू शकतील. काही प्रमाणात दिलासादायक घटनाही घडतील. धोरणात्मक निर्णय पथ्यावर पडतील. जमीन खरेदी करण्यात स्वारस्य निर्माण होईल. व्यवहारातून निर्माण होणारे वाद टाळावेत. आपल्या चांगुलपणाचा गैर फायदा घेतला जाऊ शकतो. न्यायालयीन कामकाजात यश प्राप्त होईल. कौटुबिक वाद सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ तारखा : 11 ते 14

सिंह – मौनं सर्वार्थ साधनं

आरोपांनी विचलित होऊ शकाल. प्रखर भाष्य टाळणे हिताचे ठरेल. व्यवसायात नुकसान वाढू शकते. मध्यस्थीतून मार्ग निघतील. जुनी दुखणी उकरून काढून वेळेचा अपव्यय करू नका. मौनं सर्वार्थ साधनं या मंत्राची प्रचिती घ्यावी. टोकाची भूमिका घेऊ नका. संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण केल्याने संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त राहील. शुभ तारखा : 8,9,10,13,14

कन्या – विषयाचे गांभीर्य समजून घ्या

कामाला गती मिळेल. ध्येय धोरणे यशस्वीपणे आखाल. नोकरदारांना सन्मान प्राप्त होतील. यशाच्या शिखराकडे मार्ग मिळेल. न्याय्य गोष्टींचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या बाजूने राहील. वात्रटिका टाळावी. आपल्या बोलण्याने समोरचा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी. पैशाचे व्यवहार करणे टाळावे. विषयाचे गांभीर्य समजून वक्तव्ये अथवा निर्णय करावेत. कलागुणांना सन्मान मिळेल. शुभ तारखा: 8 ते 12

तूळ – शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

सहकार्‍यांकडून मदत मिळेल. कार्यगती वाढून उन्नतीच्या दिशेने वाटचाल कराल. जोड व्यवसायात नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. वडीलधार्‍या मंडळींचा मानसन्मान राखण्याचा प्रयत्न करा. विरोधी विचारांच्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. अचानक आर्थिक संतुलन बिघडू शकेल. आनंदाच्या वातावरणात काळ व्यतीत कराल. आपल्याला लौकिकाला साजेशी कामगिरी या सप्ताहात आपल्याकडून होणार आहे. गृहस्वप्न पुर्ण होण्याचे योग आहेत. शुभ तारखा: 8 ते 14

वृश्चिक – उद्योग व्यवसायात क्रांती कराल

कोणालाही शब्द देताना काळजी घेणे आवश्यक आहे. विचलित मनस्थितीत सुधारणा होईल. प्रवासाचे बेत ठरतील. भाग्यातील गोष्टी सहज मिळतील. उद्योग व्यवसायात क्रांती कराल. लोकसहभागातून यशाकडे वाटचाल कराल. थोरांचे मत समजून घ्यावे. कौटुंबिक मतभेदांमुळे मानसिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता आहे. कामानिमत्ताने प्रवास करावा लागेल. शुभ तारखा : 11 ते 14

धनू-सामाजिक प्रतिष्ठा नावलौकिक वाढेल

चांगल्या मित्रपरिवारामुळे काळ आनंदात जाईल. भागीदारीत नवे उपक्रम सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे. दूरचा विचार करून ठरविलेले उपक्रम फायद्याचे ठरतील. कामात मन रमायला लागेल. वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक प्रतिष्ठा नावलौकिक वाढेल. स्पर्धा परीक्षेत यश संपादन कराल. भावनिक व्हाल. गृहस्वप्न पुर्ण होण्याचे योग आहेत. महिलांनी गणेश उपासना करावी.शुभ तारखा: 8,9,10, 13,14

मकर – विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील

अधिक परिश्रमाने थकवा जाणवू शकतो. जवळचेच सहकारी विरोधी कटकारस्थान करण्यात महत्वाची भूमिका निभावतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. काही प्रमाणात चुकीचे निर्णय होऊ शकतात. सामाजिक स्थितीचे भान राखून वक्तव्ये करावीत. आर्थिक नुकसान वाढणार नाही याची काळजी घ्यावी. जुन्या मैत्रिणींची भेट होईल. नोकरदारांना हा आठवडा प्रगतिशील राहील. पदोन्नती, अपेक्षित ठिकाणी बदली, नोकरीत बदल यासारख्या घटना घडण्याची शक्यता. शुभ तारखा: 11,12

कुंभ – शैक्षणिक क्षेत्रात उन्नती कराल

नव्या संकल्पना सुचतील. संततीकडून चांगले सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात उन्नती कराल. वातावरण बदलामुळे होणारे विकार उदभवू शकतात. मित्रमैत्रिणींच्या सहवासात काळ व्यतीत कराल. भागीदारीत जोड व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वैचारिक संतुलन सांभाळावे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी कीर्ती वृद्धिंगत करणारा राहील. वैद्यक किंवा तत्सम क्षेत्रात विशेष सन्मान प्राप्त होऊ शकेल. शुभ तारखा: 8,9,10,13,14

मीन – जवळचे प्रवास कराल

घर बदलाविषयीच्या चर्चा सुरु होतील. स्थानांतर संभवते. मामाकडील नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. भविष्यतील घटनांचे संकेत मिळतील. जवळचे प्रवास कराल. प्राकृतिक कारणाने अस्वस्थता जाणवू शकेल. कुटुंब व्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दूरगामी परिणामाचा विचार करून नियोजन कराल.शुभ तारखा: 11,12

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या