Thursday, September 19, 2024
Homeभविष्यवेधशशी थरूर यांचा ‘हात’ किती बळकट ?

शशी थरूर यांचा ‘हात’ किती बळकट ?

ख्यातकीर्त राजकारणी शशी थरूर यांचा जन्म 9 मार्च 1956 रोजी लंडनमध्ये झाला; परंतु त्यांचे सर्व आयुष्य भारतातच गेले. ते राजकारणी व लेखक म्हणून ओळखले जातात. 1978 साली आंतरराष्ट्रीय संबंधावर त्यांनी डॉक्टरेटची फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी पदवी प्राप्त केली. 1978 ते 2007 पर्यंत युनाइटेड नेशनच्या कामात त्यांचे आयुष्य गेले. ते 2001 साली अंडर सेक्रेटरी जनरल होते. त्या काळात, आंतरराष्ट्रीय माहिती प्रसारण व संबंध याची त्यांच्याकडे जवाबदारी होती. 2007 साली थरूर यांनी नोकरीतून निवृत्ती पत्करली. त्या आधी 2006 साली ते युनाइटेड नेशन्स मध्ये सेक्रेटरी जनरल होते.

- Advertisement -

केरळच्या थिरुवनंतपूरम येथून 2009 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत प्रवेश केला. पार्लमेंटच्या एक्सटर्नल अफेअरचे ते चेयरमन होते. युपीए सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून सुद्धा कारभार पहिला. 2019 साली त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी लिहिलेल्या अ‍ॅन इरा ऑफ डार्कनेस या पुस्तकाच्या लेखनााठी मिळाला.

शशी थरूर यांनी 1981 पासून लेखनास सुरुवात केली. त्यांनी शेकडो लेख लिहिले. त्यात मुख्यतः भारतीय संस्कृतीचा इतिहास, रूढी, चाली, परंपरा व भारताचे इतर देशांशी असलेले संबंध तसेच भारतीय चित्रपट व राजकारण यांचा समावेश होता. न्यूयार्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, न्यू वीक व टाइम्स इंडियामध्ये त्यांनी संपादकीय स्तंभलेखन केले. इंडियन एक्सप्रेस व द हिंदू या वर्तमानपत्रात सुद्धा त्यांनी नियमित संपादकीय लेखन केले. युनाइटेड नेशन्स मध्ये काम करीत असतात त्यांनी केरळची सांस्कृतिक विरासत यावर नेहमी बोलायचे. हिंदू असल्याबद्दल त्यांना अभिमान होता व आहे.

श्री. थरूर सोशिअल मीडियाचा खूप वापर करतात. त्यांच्या ट्विटरवर एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त संख्येने जोडले गेले होते. सोशिअल मीडियावर त्यांचे लिखाण खूप वेळेस वादात सापडले होते.

17 जानेवारी 2014 रोजी थरूर यांची पत्नी मृतावस्थेत सापडली. त्या वेळेस थरूर यांच्यावर आरोप झाले. कारण सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर मोठ्या जखमा होत्या; परंतु सरतेशेवटी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हा अमली पदार्थाच्या अतिरेकी डोस सेवन केल्या मुळे झाला व त्यांच्या शरीरांवरील जखमा हे मृत्यूचे कारण नाही असा अंतिम अहवालात स्पष्ट झाले.

श्री. थरूर यांचे व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक आहे व होते, ते राजबिंडे दिसतात. त्यांच्या सौन्दर्याच्या व अफेअरच्या चर्चा नेहमी रंगत असत.

1 )नंबरच्या बाणाने दाखविलेली भाग्यरेषा वळून गुरू ग्रहावर गेली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी, धार्मिक व न्यायी प्रवृत्ती वाढीस लागते व तसे आचरण त्या व्यक्तीमध्ये दिसून येते.

2 )नंबरच्या बाणाने दाखविलेली हृदयरेषा मस्तक रेषेसमीप वळून गेली आहे. यामुळे या व्यक्ती दुसर्‍याच्या प्रेमात लवकर पडतात. यांच्या प्रेमभावना नेहमी कोमल व नाजूक असतात.

3 )नंबरच्या बाणाने दाखविलेली भाग्यरेषा आहे. या भाग्यरेषेचा उगम मणिबंधापासून व आयुष्यरेषेतून झाला आहे. अशा स्थितीत या व्यक्ती भाग्यवान असतात. यांची आयुष्यातील कामे सहज होतात. यांना आर्थिक अडचण काय असते याची जाणीवसुद्धा कधी होत नाही. यांना लक्ष्मी प्रसन्न असते.

4 )नंबरच्या बाणाने दाखविलेला मस्तकरेषेचा शेवट आहे. मस्तकरेषेच्या समाप्तीला फाटे असतील तर अशा व्यक्ती अत्यंत बुद्धिवान असतात. एका वेळेस दोन तीन वेगवेगळ्या विषयांवर यांचे प्रभुत्व दिसून येते. शिवाय मस्तकरेषा मोठी व लांब आहे. त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता तल्लख आहे.

5 )नंबरच्या बाणाने दाखविलेला चंद्र ग्रहाचा भाग आहे. चंद्र म्हणजे मन, मनातील कल्पना, कल्पना विलास, नियोजन, नियोजनाच्या दृष्टीने मानाने तयार केलेले आराखडे, तसेच लेखन, साहित्य व कला यावर प्रभुत्व असते. हा चंद्र ग्रहाचा उंचवटा मनगटाकडे शुक्र उंचवट्यापेक्षा मोठा झाला आहे. त्यामुळे चंद्र ग्रह शुभ परिणाम देतो.

1 )नंबरच्या बाणाने दाखविलेला गुरू ग्रह आहे, या गुरू ग्रहाचा उंचवटा शेजारील मधल्या बोटाकडे म्हणजे शनी ग्रहाकडे खेचला गेला असेल व सुरवातीला पहिल्या बोटाखालील गुरू ग्रह सुरवातीला चपटा दिसत असेल तर अशा लोकांची विनाकारण बदनामी होते. काही वेळेस संबंध नसताना बदनामी सहन करावी लागते.

2 ) व 3 )नंबरच्या बाणाने दाखविलेली रविरेषा आहे. या रविरेषेचा उगम मस्तकरेषेजवळ झाला आहे. मान सन्मान प्राप्त करण्यासाठी मस्तकरेषेची हुशारी यांच्या कामाला येते. तसेच ती करंगळीच्या पेर्‍यात आत गेलेली असल्याने अंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त होतो.

1 )नंबरच्या बाणाने दाखविलेले व गव्हाच्या आकार झालेले याला यव चिन्ह म्हणतात. अंगठ्याच्या पहिल्या सांध्यावर असे यव चिन्ह झाले असेल तर अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात सुखाची कुठलीही कमतरता राहत नाही, अशा व्यक्ती भाग्यवान असतात.

2 )नंबरच्या बाणाने दाखविलेली चंद्र ग्रहावर एक आडवी रेषा गेलेली आहे. संपूर्ण चंद्र ग्रहाला फोटोत दाखविल्याप्रमाणे आडवी जात असेल तर, असे लोक मादक पदार्थांचे सेवन करतात किंवा त्याच्या आहारी जाऊ शकतात. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्यांचा गुरू ग्रह बलवान व शुभ असेल तर असे लोक व्यसनाधीन होत नाहीत. मात्र मादक पदार्थ सेवन करतात.

3 )नंबरच्या बाणाने दाखविलेली रविरेषा आहे. ही रेषा जेव्हा करंगळीच्या बोटाच्या अलीकडे मधल्या भागात व पेर्‍यात गेली असेल तर असे लोक आंतराष्ट्रीय ख्यातीचे असतात किंवा त्यांना जीवनात आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या