नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील भावली धरण (Darna Dam) हे ओव्हरप्लो झाले आहे. तर कडवा धरण आणि दारणा धरण (Darna Dam) ८७.०९, टक्के, नांदुरमध्यमेश्वर ९३ टक्के भरले आहे. तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) ५९.४८ टक्के इतका जलसाठा झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिटीलिंक बसचा संप मिटला; चालकांच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य
जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता कुठे काही धरणात (Dams) पाणीसाठा वाढत आहे. पण, तरीही काही धरणांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. यात नाशिक शहराला (Nashik City) पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५९.४८ टक्के जलसाठा (Water Reservoir) तर समुहात ५१.२० टक्के इतका साठा आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ३८९.५ मिली लि. म्हणजेच ८४.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. तर नाशिक विभागात एकूण ३७२.८ मिली लिटर म्हणजेच १०८.३ टक्के एवढा पाऊस नोंदवला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : १२ लाखांची मंगळसूत्रे ओरबाडली
यात इगतपुरी ८११.६ मी.ली. (५१.८ टक्के), नाशिक- २२३.१ मी.ली. (६१.८ टक्के), पेठ ७२२.९ -मी.ली. (७२.८ टक्के),
सुरगाणा ७२२.७.मी.ली. (७६.० टक्के), कळवण. २४६.८ मी.ली. (८०.२ टक्के), त्र्यंबक ११४४.४ मी.ली. (१००.२ टक्के), सिन्नर २८५.८ मी.ली. (११४.५ टक्के), बागलाण २७६.५ मी.ली. (११९.१ टक्के), मालेगाव २८६ – मी.ली. (१२८.५ टक्के ), दिंडोरी ४२७.५ – मी.ली. (१२९ टक्के), निफाड २४९ मी.ली. (१२३ टक्के), नांदगावमध्ये २८५.८ मी.ली. (१२६.५ टक्के), येवला २८३. मी.ली. (१३० टक्के), चांदवड ३५८. मी.ली. (१३९ टक्के), देवळा ३०३.७ मी.ली. (१५६ टक्के) कळवण २४६.८ ८० इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : व्ही. एन. नाईक संस्थेवर ‘प्रगती’ चा झेंडा; अध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड विजयी
दरम्यान, सर्वांत कमी पाऊस नाशिक आणि इगतपुरी (Nashik and Igatpuri) या ठिकाणी नोंदविण्यात आला आहे. तसेच या तालुक्यातील (Taluka) पावसाने (Rain) सरासरीही गाठली नसल्याने या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर पेठ, सुरगाणा, कळवण या भागातही पावसाचे प्रमाण कमी असंल्याचे चित्र आहे.
धरणांतील जलसाठ्याची आजची स्थिती
गंगापूर ५९.४८ टक्के, कश्यपी ४०.१७ टक्के, वाघाड ४४.१४ टक्के, दारणा ७८.१४ टक्के, भावली १०० टक्के, गिरणा २७.५० टक्के, मुकणे ६४.६५ टक्के, पालखेड ५०.३८ टक्के, कडवा ७२.९९ टक्के, करंजवण ३८.६३ टक्के, चणकापूर ४७.६३ टक्के, ओझारखेड २७.०० टक्के, वालदेवी ३९.८९ टक्के, भोजपुर ३२.१३ टक्के, नांदूरमध्यमेश्वर ५४.४७ टक्के
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा