Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याभेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी

भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी

शेगाव – दिपक सुरोसे
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळ येथे घट बसवण्यात आले आहेत. तब्बल ३५० वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केले जाते. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घटमांडणीत भाकीत वर्तवलं जातं. यंदाही दि.१० में रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी करून आज दि.११ वार शनिवारी सकाळी भाकिते वर्तवण्यात आली आहेत. यंदाच्या भाकितानुसार यंदा पेरण्या उशिरा होणार आहेत. मात्र, यंदा पाऊस चांगला होणार आहे. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर यंदा पिके चांगली येण्याची भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे.

पहाटे ६ वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली होती. या घागरीवर पुरी, करंजी, पापड यासारखे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात आणि या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थिती सोबतच राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तविला जाते.

- Advertisement -

काय आहे यंदाचं भाकीत?
भेंडवडची मांडणी पिके

१) कापूस पिक. सर्व साधारण
२) ज्वारी पिक:-साधारण
३) भावात चांगले
४) तूर पिक: – साधारण
५) मुंग पिक: – चागले
६) उडीद पिक :- सर्वसाधारण
७) तीळ पिक :- चागले
८) भादली :- रोगराई जास्त
९) बाजरी पिक :- साधारण
१०) तांदूळ पिक :- चांगले, भावात तेजी
११) मठ पिक सर्व – साधारण
१२) जवस् पिक :- साधारण,नासाडी
१३) लाख पिक :- साधारण भावत तेजी
१४) वाटाणा पिक :- साधारण
१५) गहू पिक – चांगले, भावात तेजी
१६) हरबरा:-साधारण, भाव कमी

घागर…
पहिला महिना जून – कमी, कुठे जास्त पाऊस येणार, पेरणी उशीर होऊ शकते
दुसरा महिना जुलै – पाऊस सर्वसाधारण राहील
तिसरा महिना ऑगस्ट – चांगला जास्त पाऊस येणार,
चौथा महिना सप्टेंबर – जास्त, व अवकाळी पाऊस पडणार

देश…
पानांचा विडा गणपतीचे प्रतिक
आहे ते कायम आहे.
संरक्षण खाते मजबूत राहील
परकीय देशाचा त्रास राहील
आर्थिक परिस्थिती चांगली
राहील

पीक, पाणी सर्वसाधारण

गुढीपाडव्याला झालेल्या पाराच्या मांडणीचे अक्षय तृतीयेच्या घट मांडणीशी साधर्म्य आहे. घट मांडणीमध्ये यावर्षी पाण्याची घागर, सांडोळी, कुरडी, भजा, वडा, पापड, पुरी आणि पानसुपारी हे सर्व कायम असल्याने सर्व काही चांगले असल्याचे पुंजाजी महाराजांनी यांनी विविध न्युज, पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या