पुणे | प्रतिनिधी |Pune
पुण्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. कोरोनाग्रस्त रुंगांना बेड्स आणि व्हेंटीलेटर उपलब्ध होत नाही. वेळेवर बेड्स आणि व्हेंटीलेटर वेळेवर उपलब्ध न झाल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहे. या समस्येबाबत पुण्यात भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं ‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?’ असं म्हणत भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेवर निशाणा साधला. तसेच बेडच्या कमतरतेवर प्रशासनाचं लक्ष वेधलं.
भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रुग्णालयातील बेड आणून ठेवत ‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देतं का बेड?’ असं म्हणत आंदोलन केलं. यावेळी भीम आर्मीने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच अधिकचे बेड उपलब्ध करुन देण्याऐवजी रुग्णांना घरीच ठेवण्यावर आक्षेप घेतला.