Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण

Ahilyanagar : भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण

14 मंडळ अध्यक्ष व डीजे मालकांवर गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार उपनगरातील गणपती बाप्पाचे विसर्जन आठव्या दिवशी केले जाते. यावेळी गुरूवारी (4 सप्टेंबर) झालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांकडून ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. आवाजाची कायदेशीर मर्यादा न पाळता मोठ्या आवाजात डीजे वाजविणार्‍या मंडळांचे अध्यक्ष तसेच साऊंड सिस्टीम (डीजे) मालकांविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याविरूध्द पर्यावरण संरक्षण, ध्वनीप्रदूषण आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सम्राट तरूण मंडळाचे अध्यक्ष रोहित दिगंबर गोडळकर, डीजे मालक अमोल दिंगबर तरटे, आझाद तरूण मंडळाचे अध्यक्ष मयुर राजू मेहतानी, डीजे मालक साजीद सलिम खान, हनुमान तरूण मंडळाचे अध्यक्ष कातीक शंकर अटलुर, डीजे मालक जुबेर शब्बीर सय्यद, महामंकाळी तरूण मंडळाचे अध्यक्ष सोमेश पोपट तागडकर, डीजे मालक शुभम शहाजी भाकले, जय बजरंग तरूण मंडळाचे अध्यक्ष सागर उत्तम डुकरे, डीजे मालक अनिकेत अरविंद हनुमंते, साईबाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा आप्पा भागानगरे, डीजे मालक आकाश राजेंद्र भांगळे, भोइरे तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शिवाजी निस्ताने, डीजे मालक तुलभ गोरखनाथ नागे, अमृतनाथ तरूण मंडळाचे अध्यक्ष परसराम अशोक आळकुटे, डीजे मालक खंडु एकनाथ नरवडे, मळथडी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भिमाजी धोत्रे, डीजे मालक सोमा किसन धाडगे, सिध्दिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष निखील अश्विन घोरपडे, डीजे मालक मनोज मधुकर मगर, भुगऋषी तरूण मंडळाचे अध्यक्ष जगदीश दिगंबर वाघरस्कर, डीजे मालक दादा नंदु निमसे, शुक्लेश्वर तरूण मंडळाचे अध्यक्ष संदेश विनायक वाघरस्कर, डीजे मालक स्वप्नील मुरलीधर कुंभार, समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केतन सुधारक गोवेकर, डीजे मालक गणेश बाबुराव किर्लोकर, बाणेश्वर प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी बादशाह निस्ताने, डीजे मालक मंगेश कानिफनाथ लकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...