Wednesday, May 6, 2026
HomeनगरAhilyanagar : दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश

Ahilyanagar : दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश

भिंगार परिसरात नागरिकांची एकच गर्दी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार येथील सौरभनगर परिसरात सोमवारी (16 फेब्रुवारी) सकाळी नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने तब्बल दोन तास परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. अखेर वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

- Advertisement -

सकाळच्या सुमारास सौरभनगर भागात काही नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. सुरूवातीला नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या घाबरून इथेतिथे पळू लागला. यादरम्यान त्याने एका घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप घालत त्याला जखमी केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने वनविभाग आणि भिंगार पोलिसांना कळविले. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच भिंगार पोलीस दाखल झाले. बिबट्याचा माग काढत त्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही काळ बिबट्या झुडपांमध्ये लपून बसल्याने पकडण्यास अडचणी निर्माण झाल्या. मात्र पथकाने संयम बाळगत जाळे आणि इतर साहित्याच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला जेरबंद केले.

बिबट्या पकडण्यात यश आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या. पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वनक्षेत्रात सोडण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

ताज्या बातम्या

टाकळीभान-नेवासा मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात; धडक देऊन दुचाकीस्वार पसार, एकजण गंभीर...

0
टाकळीभान (प्रतिनिधी) रस्त्यावरील बेफाम वेगाचा आणि माणुसकी हरवलेल्या वृत्तीचा प्रत्यय देणारी एक घटना टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावर घडली आहे. लोखंडी फाॕल परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक...