Sunday, April 27, 2025
Homeनगरटोळक्याकडून युवकाला भिंगारमध्ये मारहाण

टोळक्याकडून युवकाला भिंगारमध्ये मारहाण

चौघांविरूध्द कॅम्प पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चौघांच्या टोळक्याने युवकाला शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भिंगारच्या शुक्रवार बाजार परिसरातील शनि मंदिराजवळ घडली. यश सचिन भिंगारदिवे (वय 18 रा. सदर बाजार, भिंगार) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलमानुसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निग्रो (पूर्ण नाव नाही), शाहीद शेख, खुदाबक्ष (पूर्ण नाव नाही) व एक अनोळखी (सर्व रा. सदर बाजार, भिंगार) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदरची घटना मंगळवारी (2 जुलै) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली असून बुधवारी (3 जुलै) कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यश भिंगारदिवे मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास शुक्रवार बाजार येथील शनि मंदिराजवळ असताना चौघे संशयित आरोपी तेथे आले व ‘तू यश आहे का’, असे म्हणून त्यांनी काही एक न विचारता यशला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत यश जखमी झाला असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवी टकले करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...