Saturday, May 30, 2026
HomeनगरShrirampur : भिशीच्या नावाखाली भोंदू शिंदे याचा अनेकांना लाखोंचा गंडा!

Shrirampur : भिशीच्या नावाखाली भोंदू शिंदे याचा अनेकांना लाखोंचा गंडा!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून ओळख निर्माण केलेल्या बेलापूर येथील कथित ‘बाबा’ गणेश शिंदे यांच्यावर आता आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप पुढे येऊ लागले आहेत. भिशीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून परिसरातील अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. तसेच, एका व्यापार्‍याला तब्बल 80 लाख रुपयांचा फटका बसल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित व्यापार्‍याने छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात त्याच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी 12 मे रोजी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी सुरुवातीला जमिनीच्या व्यवहारांमधून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यानंतर भिशीचा व्यवसाय सुरू करत मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले. मात्र, भिशी उचलल्यानंतर पुढील हप्ते भरण्यात टाळाटाळ केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परिणामी, भिशीत सहभागी झालेल्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणात बेलापूरमधील एका व्यापार्‍याची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्याची पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अशाच प्रकारे इतर अनेकांना देखील शिंदे यांनी आर्थिकदृष्ट्या गंडा घातल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. पोलीस भोंदू गणेश शिंदे याचे आर्थिक व्यवहारही तपासण्याची शक्यता असून अधिकृत तक्रारी पुढे आल्यास या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या गुंतवणूक योजनांबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...