Monday, May 5, 2025
Homeधुळेबलात्कारप्रकरणी धुळ्यातील युवा नेत्याला भिवंडी पोलिसांच्या बेड्या

बलात्कारप्रकरणी धुळ्यातील युवा नेत्याला भिवंडी पोलिसांच्या बेड्या

धुळे । dhule। प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून सोबत नेत इगतपुरीच्या तरुणीवर पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कारप्रकरणी (rape case) धुळ्यातील एका युवा नेत्यावर (youth leader) कोनगाव (भिवंडी) पोलिसात (Bhiwandi police) गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात त्या युवा नेत्याला काल दुपारी भिवंती पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरी) येथील 31 वर्षीय पीडितेने कोनगांव (भिवंडी) पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिला लग्नाचे आमिष दाखवून भिवंडी येथील हॉटेल ग्रीन कॉन्टी येथे नेण्यात आले. तिथे तिच्या डोक्याला पिस्तुल लावत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. तसेच शारिरीक संबंधाचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

अत्याचाराचा हा प्रकार 1 नोव्हेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान घडला. दि.1 फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीने कोनगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी धुळ्यातील युवा नेत्याविरुध्द भादंवि कलम 376 (2) एन प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर काल भिवंडी पोलीस धुळ्यात दाखल झाले होते.

त्यांनी त्या युवा नेत्याला त्यांच्या देवपूरातील जिल्हा क्रिडा संकुल परिसरातील घरातून ताब्यात घेतले. हा युवा नेता एका संघटनेचा अध्यक्ष असल्याचे समजते. ही कारवाई एसीपी किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक डी.पी. नागरे, महिला पोलीस उपनिरीक्षक ए. डी. घाटगे यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

HSC Result 2025 : आज बारावी परीक्षा निकाल; दुपारी एकपासून ऑनलाईन...

0
पुणे | वृत्तसंस्था | Pune इयत्ता बारावीच्या (HSC) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा (Results) निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या (दि.५)...