Wednesday, October 16, 2024
Homeमनोरंजनधक्कादायक! अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल, हॉटेलमध्ये घेतला...

धक्कादायक! अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल, हॉटेलमध्ये घेतला गळफास

सध्या मनोरंजन विश्वाला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. भोजपूरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीनं आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

भोजपूरी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनं भोजपूरी मनोरंजनसृष्टीती हादरली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह मिळाला आहे.

- Advertisement -

आकांक्षा दुबेच्या कुटुंबात तिचे आई-वडील आणि भावंड आहेत. तिचे कुटुंब उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात राहते आणि तीही कुटुंबासोबत राहत होती. परंतु तिने आत्महत्या का केली याचे कारण समजलेलं नाही.

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा दुबे लोकप्रिय नाव आहे. इंस्टाग्राम रिल्समध्येही तिला खूप पसंती मिळायची. आकांक्षा दुबे ही तिच्या म्युझिक अल्बममुळे नेहमी चर्चेत असायची, आता तिची अचानक आत्महत्या खूप धक्कादायक आहे. आकांक्षाने आत्महत्या का केली याचं खरं कारण अद्याप समोर आलेले नाही.

आकांक्षाने २०१९ मध्ये मेरी जंग मेरा फैसला या सिनेमातून ॲक्टिंग करिअरला सुरूवात केली होती. यात तिचा कॅमिओ रोल होता. भूमिका लहान होती, पण आकांक्षाच्या या भूमिकेचं अपार कौतुक झालं होतं. यानंतर मुझसे शादी करोगी व साजन असे अनेक हिट भोजपुरी सिनेमे तिने दिलेत.

आकांक्षाच्या आत्महत्येनंतर काही तासांनी अभिनेत्रीचे शेवटचे गाणे रिलीज करण्यात आले. ‘ये आरा कभी हरा नहीं’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. आत्महत्येच्या एक दिवस आधी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसतेय.

जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंगसोबतचे फोटो तिने पोस्ट केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या