Tuesday, March 25, 2025
Homeनगरभोकरला हिट अ‍ॅण्ड रन, मतमाऊलीचे दोन यात्रेकरू गंभीर जखमी

भोकरला हिट अ‍ॅण्ड रन, मतमाऊलीचे दोन यात्रेकरू गंभीर जखमी

भोकर |माळवाडगाव |वार्ताहर| Bhokar

तालुक्यातील भोकर शिवारात हिट अ‍ॅण्ड रनचा प्रकार घडला. शहराप्रमाणे व पिक्चर स्टाईलने भरधाव आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने हरेगाव येथे मतमाऊली यात्रेसाठी चाललेल्या भक्तांच्या मोटार सायकलला धडक देवून दोघांना गंभीर जखमी केले. स्कॉर्पिओला गुंतलेली मोटारसायकल सुमारे एक किलोमीटर ओढत नेवून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु भोकर, मुठेवाडगाव शिवारातील नागरीकांनी एकमेकांना संपर्क करत त्या स्कॉर्पिओचे अनेकांनी शुटींग काढल्याचे लक्षात आल्याने सदर गाडी भोकर-मुठेवाडगाव शिवारात सोडून चालक पसार झाला.

- Advertisement -

श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भोकर शिवारात काल नेवासाकडून भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (क्र. एमएच 20 जीटी 3330) हिने आपल्या पुढे चाललेल्या मोटार सायकल (क्र.एमएच 17 सीटी 6747) हिला जोराची धडक दिली. यामध्ये मोटार सायकलवरील दोघे तरूण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्कॉर्पिओ चालकाने मोटारसायकल खोकर फाटा येथून खानापूर रोडने सुमारे एक किमीपर्यंत असलेल्या अभंगवस्तीपर्यंत ओढून नेली. तेथून मुठेवाडगावमधून भोकररोडने निर्जन ठिकाणी स्कॉर्पिओ सोडून गाडी चालक व इतरजण पसार झाले. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्कॉर्पिओे सापडली. या अपघाताची माहिती देत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांच्याशी संपर्क साधल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन व पोलीस कॉन्स्टेबल संतोष कराळे यांनी ती स्कॉर्पिओ घटनास्थळी येऊन ताब्यात घेतली. पुढील तपास सुरू तालुका पोलीस करत आहे.

या अपघातातील दोघा जखमींना येथील युवकांनी व नागरिकांनी साखर कामगार येथे उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींची नावे उपलब्ध होऊ शकले नाही. याप्रकरणी तालुका पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या स्कॉर्पिओचा वेग बघून अनेक बघ्यांना धडकी भरली होती. या अपघातानंतर त्या भरधाव स्कॉर्पिओचा व्हिडीओ सध्या परीसरातील सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चर्चेचा विषय ठरलेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...