Tuesday, May 21, 2024
Homeनगरभोकर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

भोकर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील पटारे वस्तीवर बिबट्याने मुक्त गोठ्याची जाळी तोडून आत प्रवेश करून एका शेळीस जखमी केले. या घटनेने परिसरात भिती पसरली असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. सध्या भोकर परिसरात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे.

- Advertisement -

परिसरातील शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन हे नित्याचेच झाल्याने जीव मुठीत धरून शेतातील कामे करताना शेतकरी दिसत आहे. त्यातच रविवारी रात्री संजय आसाराम पटारे यांच्या वस्तीवर या बिबट्याने तार कंपाऊंड असलेल्या मुक्त गोठ्यात प्रवेश करून शेळीवर हल्ला चढविला. परंतु हा प्रकार लक्षात आल्याने संजय पटारे कुटूंबियांसह शेळ्यांच्या गोठ्याकडे धावले व आरडाओरड केल्याने या आवाजाने वस्तीवरील लगतचे शेतकरीही धावल्याने बिबट्याने शेळी टा़कून धुम ठोकली. दरम्यान, ही घटना घडून चोवीस तास उलटूनही वन विभागाने या वस्तीवर भेट दिली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांत वनविभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या