Monday, May 27, 2024
Homeजळगावभोकर नदीला पूर ; नव्याने बांधलेला पूल पाण्याखाली

भोकर नदीला पूर ; नव्याने बांधलेला पूल पाण्याखाली

रावेर। Raver । प्रतिनिधी

नुकताच पुनखेडा येथील भोकर नदीवर तब्बल 3 कोटी 46 लाख रुपये खर्चून बांधलेला धोकादायक बनला आहे. काही महिन्यापूर्वी या पुलाचे काम झाले आहे. अजून वर्ष देखील पूर्ण झालेले नसतांना, पूल (bridge) धोकादायक बनला आहे.

- Advertisement -

या पुलाची तपासणी सक्षम यंत्रणेकडून व्हावी अशी मागणी नागरिक करत आहे.शनिवारी झालेल्या संततधार पाऊसाने भोकर नदीला पूर (Bhokar river) आल्याने या पुलावरून पाणी गेल्याने,पुनखेडा गावाचा रावेरपासून संपर्क तुटला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.

भोकर नदीला तीन दिवसात दोन वेळा मोठे पूर आल्याने,नदी काठावरील गावातील नागरिकांना भीती वाटत आहे. नुकताच नदीवर बांधलेल्या पुनखेडा जवळील पुलावरून पाणी गेल्याने, आता बांधलेल्या पुलाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे केले जात आहे.

अधिकार्‍यांनी पूल बांधकाम करतांना उंची आणि रुंदी बाबत योग्य अशी मापे न काढल्याने पूल पाण्याखाली गेल्याने नागरिक संतप्त झाले आहे. या पुलाच्या बांधकामाची तसेच ज्या अधिकार्‍यांनी पुलाचे आराखडा केला त्या सर्व अधिकार्‍यांची चौकशी व्हावी अशी देखील मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या