मुंबई । Mumbai
हिंदी चित्रपट सृष्टीत हिरो नंबर वनचा दावेदार बनलेल्या कार्तिक आयर्नच्या (kartik aaryan) ‘भूलभुलैय्या २’ ने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने २४ व्या दिवसाच्या कमाईत पृथ्वीराज, आरआरआर आणि पुष्पा पार्ट वन या चित्रपटांना मागे टाकले आहे…
दिग्दर्शक अनिश बज्मी (Anees Bazmee) दिग्दर्शित ‘भूल भुलैया २’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून चौथ्या रविवारपर्यंत (दि. १२) ३.४५ कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने आतापर्यंत १७१.१७ कोटींचा व्यवसाय केला आहे. गेल्या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कमाई केली आहे.
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Aadvani) यांच्यासह तब्बू (tabu) संजय मिश्रा ( Sanjay Mishra) राजपाल यादव (Rajpal Yadav) यांच्याही मुख्य भूमिका असून हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
दरम्यान, ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाने सुरुवातीच्या ३ दिवसात ५० कोटी रुपये, त्यानंतर ५ दिवसात ७५ कोटी रुपये, ९ दिवसात १०० कोटी रुपये, ११ दिवसात १२५ कोटी रुपये आणि १७ दिवसात १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट लवकरच २०० कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे.