नंदुरबार । Nandurbar
नंदुरबार शहरासह जिल्हयात उद्या दि.9 फेब्रुवारी रोजी जवळपास 65 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते व जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खा.डॉ.हीना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत. यात 34 कोटी 83 लाख रुपये खर्चाच्या 100 खाटांच्या माता व बालसंगोपन रुग्णालयाचा समावेश आहे.
नंदुरबार शहरासह जिल्हयात उद्या दि.9 फेब्रुवारी रोजी जवळपास 65 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.हीना गावित उपस्थित राहणार आहेत. यात शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 34 कोटी 83 लाख रुपये खर्चाचे 100 खाटांचे माता व बालसंगोपन रुग्णालय बांधकाम करण्याचा शुभारंभ, 6 कोटी 19 लाख 15 हजार रुपये खर्चाचे 30 बेडचे आयुष हॉस्पीटल इमारत बांधकाम करणे, शहरातील सर्किट हाऊसजवळ 5 कोटी 46 लाख 70 हजार रुपये खर्चाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपविभाग क्रं- 1 व 2 कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे, आरटीओ कार्यालयाजवळ सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार यांच्या कार्यालयाचे बांधकाम करणे, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात 4 कोटी 95 लाख 22 हजार रुपये खर्चाचे ट्रामा केअर युनिटचे उद्घाटन तसेच नवापूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 33 लाख 74 हजार रुपये खर्चाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात चौक सुशोभिकरण कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.