नशिराबाद ता.जळगाव (वार्ताहर) nashirabad
नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे दिलेले अभिवचन लक्षात ठेवले असून याचमुळे अविरतपणे शहरातील विकासकामांना वेग दिलेला आहे. सहा कोटी रूपयांची कामे सुरू होत असून आगामी काळात यापेक्षाही व्यापक प्रमाणात कामे करण्यात येणार असून नशिराबादचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केले. ते नशिराबाद येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
आगामी काळात नगरविकास खात्याच्या माध्यमातून पाच कोटींची विकासकामे शहरात केली जातील अशी ग्वाही देतांना स्थानिक प्रशासनाने नशिराबादमधील कॉलनी भागातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर मुख्याधिकार्यांनी वाघूर धरणातून (Waghur Dam) पाणी पुरवठा योजनेसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेत. या माध्यमातून नशिराबादकरांची तहान भागविणार असल्याचे ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
याप्रसंगी शहरात नऊ ठिकाणी विविध कामांचे भूमिपुजन करण्यात आले. विशेष म्हणजे सत्तांतरानंतर प्रथमच ना.पाटील यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यासोबत शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा हा जिल्ह्यातील पहिला मोठा कार्यक्रम ठरल्याचेही दिसून आले.
ना.गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्याच्या हितासाठी आपण आपली राजकीय कारकिर्द पणाला लाऊन निर्णय घेतला आहे. हा निर्णय बरोबर की चूक ही जनताच ठरविणार आहे. नशिराबादच्या विकासासाठी आपण दिलेला शब्द पाळला असून याचमुळे आधी ग्रामीण रूग्णालयासह विविध कामांना गती आली असून यात आता नव्या सहा कोटीच्या कामांची भर पडली आहे. शहराचे ग्रामदैवत असणार्या झिपरूअण्णा देवस्थानासाठी अजून वाढीव निधीचा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
मोटार सायकल रली व भूमिपूजन कार्यक्रम
ना.गुलाबराव पाटील यांनी नशिराबादच्या विकासकामांसाठी मोठा निधी प्रदान केला असून यातील अनेक कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. तर त्यांनी शहरात नवीन कामांना मंजुरी देखील मिळविली असून याच कामांचे भूमिपुजन दि.२१ रोजी करण्यात आले. यानंतर झिपरूअण्णा महाराज देवस्थानाच्या परिसरात मुख्य कार्यक्रम पार पडला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी पं.स. सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), डॉ.कमलाकर पाटील, तुषार महाजन, जागृती चौधरी, नरेंद्र सोनवणे, रमेश पाटील, युवासेनेचे शिवराज पाटील, नगरसेवक पियुष कोल्हे, धरणगावचे माजी पं.स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, बाजार समिती संचालक अनिल भोळे, निलेश पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, योगेश पाटील, विकास धनगर, मंदिराचे विश्वस्त कैलास व्यवहारे, प्रदीप बोढरे, किरण पाटील, चंद्रकांत भोळे, चेतन बर्हाटे, कैलास नेरकर, किर्तीकांत चौबे, जयंत गुरव, ठेकेदार श्री.शर्माजी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, बांधकाम अभियंता एम.के. फारूकी, पाणी पुरवठा अभियंता अतुल चौधरी, दौलत कुट्टे, संतोष रगडे, सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपअभियंता गिरीश सूर्यवंशी, शाखा अभियंता बी.टी.रायसिंग, उपअभियंता सुभाष राऊत, प्रकाश पाटील, जितु नारखेडे, अनिल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा मंदिर ट्रस्ट तर्फे विश्वस्त कैलास व्यवहारे यांनी, न.पा.मार्फत मुख्याधिकारी रवींद्र सोनावणे यांनी सार्वजनिक बांधकाम तर्फे उप अभियंता गिरीश सूर्यवंशी यांनी तर शिवसेना-भाजपा युती तर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन बी.आर.खंडारे यांनी तर प्रास्ताविक झिपरूअण्णा महाराज देवस्थानाचे विश्वस्त कैलास व्यवहारे यांनी प्रास्ताविकातून ना.गुलाबभाऊ पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्याने देवस्थानाचे सुशोभीकरण होणार असल्याने व नशिराबादच्या विकासाला गती मिळत असल्याने आभार मानले. न.पा. चे लेखापाल संतोष रगडे यांनी आभार प्रदर्शन केले.
शिवसेना भाजपा युतीचा पुन्हा गजर!
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती झाली. यामुळे जिल्ह्यातील समीकरण देखील बदलले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून दूरावा असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षात सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले आहे. अर्थात, जिल्ह्यात दोन्ही पक्षांचा एकत्रीत कोणताही कार्यक्रम अद्याप झाला नव्हता. नशिराबाद येथील कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना-भाजपा युतीचा विजय असो अशा घोषणा दिल्याने जिल्ह्यात पुन्हा युतीचा गजर झाल्याचे दिसून आले आहे.
या कामांचे झाले भूमिपुजन
याप्रसंगी पर्यटन विभागातर्फे संत श्री झिपरू महाराज समाधी मंदिर परिसर विकास व सुशोभीकरण २ कोटी १३ लक्ष , नशिराबाद ते बेळी रस्त्यावरील गावाजवळील रस्त्याच्या पुलाची मोठी दुरूस्ती : मूल्य २० लक्ष ; १५ वा वित्त आयोगाच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे : मूल्य १ कोटी; न. पा. कर प्रणाली संगणीकीरण आणि अनुसूचीत जाती नवबौध्द घटक रस्ते कॉंक्रिटीकरण आणि बांधकाम : मूल्य ७० लक्ष रुपयांचे आदी कामांचे भूमीपुजन झाले.
अनुसुचित जाती आणि नवबौध्द घटकांची वस्ती योजनेच्या अंतर्गत धनगर खिडकी ते रमाई आंबेडकर नगर वस्ती भुमीगत गटर : मूल्य ४ लाख ९९ हजार; मातंग समाज वस्ती ते रमाई आंबेडकर नगर नगर रस्ता कॉंक्रिटीकरण : मूल्य ३ लक्ष ४ हजार रूपये; सिध्दार्थ नगर ते न्यू इंग्लीश स्कूल पोहच रस्ता : मूल्य ३ लाख ४ हजार रूपये; स्वातंत्र्य चौक ते सिध्दार्थ नगर रस्ता कॉंक्रिटीकरण : मूल्य ३ लक्ष ४ हजार रूपये; दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत मेहमूद झारे यांच्या घरापासून ते अब्दुल्ला बागवान यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य ३ लाख १८ हजार रूपये; रज्जाक बागवान ते युसुफ बागवान यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य ११ लाख ६७ हजार रूपये; एजाज अली यांच्या घरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य २ लाख ६५ हजार रूपये; अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत बादुमिया मोहल्ला कब्रस्थान संरक्षण भिंत बांधकाम : मूल्य सुमारे १२ लक्ष ५० हजार रूपये; मोमीन मोहल्ला कब्रस्थान संरक्षण भिंत बांधकाम : मूल्य सुमारे १२ लक्ष ५० हजार रूपये;
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत भवानी नगर येथे जगन दामू नाथ ते योगेश माळी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण : मूल्य ७ लाख ६५ हजार रूपये; हनुमान मंदिर एरिया भवानी नगर पेव्हींग ब्लॉक बसविणे : अंदाजे मूल्य ४ लाख ३३ हजार रूपये या कामांचे भूमीपुजन होणार आहे. दलीत्तेतर वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. यात भवानी नगरातील सतीश चौधरी ते संदीप सुरवाडे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटारी आणि धापे बांधणे : अंदाजे मूल्य ४ लाख ३३ हजार रूपये; भवानी नगरातच अशोक माळी ते कमलाकर रंधे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे : मूल्य सुमारे २ लाख ५४ हजार रूपये; भवानी नगरात बेळी रोड ते उमाकांत वाघ यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे : मूल्य ६ लाख ८० हजार रूपये; गोपाळ भारूडे ते दिनेश पटेल यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण : मूल्य सुमारे ४ लाख २४ हजार रूपये या कामांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांची वस्ती योजनेच्या अंतर्गत संजय रंगमले ते नथ्थू देवरे यांच्या घरांच्या दरम्यान रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य ४ लाख ९९ हजार रूपये तसेच पंढरी सोनवणे ते वाकी नदीच्या दरम्यान भूमिगत गटार बांधकाम करणे : मूल्य ४ लाख ९९ हजार रूपये या कामांचा समावेश आहे.
दलीत्तेतर वस्ती सुधार योजना २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुक्तेश्वर नगरात नितीन रंधे ते भैय्या बार्हे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य ६ लाख ८० हजार रूपये; मुक्ताईनगरात विजय रंधे ते अतुल महाजन यांच्या घरांच्या दरम्यान रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ३ लाख ३९ हजार रूपये या कामांचा समावेश आहे. याच योजनेत वरची आळी येथे जिम्नॅशियम हॉल बांधकाम करणे : मूल्य अंदाजे २५ लक्ष ७५ हजार रूपये; वरची आळी येथील सुपडू गेंदा रंधे ते विजय वाणी यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे : मूल्य ६ लाख ९४ हजार रूपये यांचेही भूमीपुजन करण्यात आले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाच्या अंतर्गत न्यू इंग्लीश स्कूल ते स्वामी समर्थ केंद्राजवळ रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य १२ लाख ७६ हजार रूपये या कामाचे भूमीपुजन करण्यात येईल. याच योजनेच्या अंतर्गत सावता नगरात रस्ता कॉंक्रीटीकरण आणि गटार बांधकामे करणे : मूल्य २५ लाख ७३ हजार रूपये याचेही भूमीपुजन होणार आहे. याच योजनेच्या अंतर्गत बन्सी नाथ यांचे घर ते वाकी नदीच्या दरम्यान रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : ४ लाख २४ हजार रूपये; नशिराबाद पेठ येथे लेवा पंच मढी ते उमाळा रोडपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण : मूल्य ९ लक्ष ४५ हजारू रूपये; पेठ येथे रवींद्र पाटील यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : १० लाख २० हजार रूपये; विशाल चौधरी यांचे घर ते उमाळा रस्त्यापर्यंत कॉंक्रीटीकरण करणे : मूल्य ११ लाख ९९ हजार रूपये या कामांचा समावेश आहे. तर दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत पेठ स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसविणे : मूल्य ४ लाख ३३ हजार रूपये या सर्व कामांचे भूमीपूजन करण्यात आले.