नाशिक | प्रतिनिधी Nashik
मराठा समाज व धनगर समाज वसतिगृह, वनभवन इमारत यांचे भूमिपूजन व महिला रुग्णालयासह इंदिरानगर बोगदा रुंदीकरणाचे ऑनलाइन भूमिपूजन तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाचे ऑनलाइन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उत्साहात झाला.
मध्य नाशिकच्या भाजपा आ. देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे मराठा समाजातील 500 विद्यार्थी व पाचशे विद्यार्थिनींसाठी बांधण्यात येणार्या दहा मजली वस्तीगृहाचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज मानव संशोधन व विकास संस्था (सारथी) संस्थेमार्फत केले जाणार आहे. तसेच धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांसाठी व 100 विद्यार्थिनींसाठी वस्तीगृहाचे बांधकाम देखील केले जाणार आहे.
नाशिक येथील वनविभागाचे कार्यालय अत्याधुनिक करण्यात येणार आहे. या तिन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा त्र्यंबक रोड येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी मंत्री महादेव जानकर, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, माजी खासदार हेमंत गोडसे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आ. देवयानी फरांदे यांनी पाच वर्षे केलेल्या कामाचा कार्य वृत्तांत विकासवार्ताचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, सचिन ठाकरे, वसंत उशीर, मिलिंद भालेराव, नाना शिलेदार सुनील देसाई, स्वाती भांबरे, वेंकटेश मोरे, सचिन मोरे, गणेश मोरे, सुनील फरांदे अमोल गांगुर्डे अक्षय गांगुर्डे शिवा जाधव आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा, धनगर समाजातर्फे सत्कार
भूमिपूजन झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने सुनील बागुल, शिवाजी सहाने, करण गायकर , नानासाहेब बच्छाव, चेतन शेलार, प्रफुल्ल वाघ आदींनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार केला. यानंतर सकल धनगर समाजाकडून विजय हाके, बाबूलाल तांबडे, किरण थोरात, योगेश सरोदे, निलेश शाखे, राजेंद्र शिंदे, प्रल्हाद केसकर, बापू शिंदे आदींनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आ. देवयानी फरांदे यांचा सत्कार केला.