Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकश्री शिवपुराण कथा मंडपाचे भूमिपूजन संपन्न

श्री शिवपुराण कथा मंडपाचे भूमिपूजन संपन्न

नाशिक | Nashik

नाशिक येथे आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन नाशिक येथे दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमिपूजन आज रोजी पार पडले. यावेळी महंत भक्ती चरणदास महाराज व नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

- Advertisement -

नाशिक येथील भवानी माथा, दोंदे मळा, पाथर्डी गाव, येथे जाधव पेट्रोलपंप समोर हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता श्री शिवपुराण कथा मंडपाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

यावेळी खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, भाऊ चौधरी, अजयजी बोरस्ते, प्रवीण तिदमे, सुवर्णा मटाले, रामराव पाटील, सचिन भोसले, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, अमोल जाधव, शाम साबळे, दिनकर पाटील, कांचन ताई पाटील, निलेश गाढवे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, धनंजय बेळे, रंजन ठाकरे, प्रशांत बछाव, आदी पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या