Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकराष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिकच्या भोसला मिलीटरी शाळेला पुरस्कार

राष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिकच्या भोसला मिलीटरी शाळेला पुरस्कार

नवी दिल्ली| वृत्तसंस्था

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय विदयालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी मुलींच्या शाळेने व्दितीय पुरस्कार पटकावला. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी या मुलांच्या शाळेने तृतीय पुरस्कार पटकावला. आज केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक २४ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. भारतीय सैन्य दलाच्या प्रत्येक अंगामधून नियुक्त केलेल्या जूरी सदस्यांनी विजेत्यांची निवड केली.

मुलींसाठीचा पाइप बँड पुरस्काराअंतर्गत प्रथम पुरस्कार पीएम श्री कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पाटमदा, पूर्व सिंगभूम, झारखंड (पूर्व विभाग) व्दितीय पुरस्कार भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक, महाराष्ट्र (पश्चिम विभाग) तृतीय पुरस्कार श्री ठाकुर्ड्वारा बालिका विद्यालय, गाझियाबाद, उत्तर प्रदेश (उत्तर क्षेत्र) यांना प्रदान करण्यात आला.

मुलांसाठी पाइप बँड पुरस्कार श्रेणीत प्रथम पुरस्कार सिटी मोंटेसरी स्कूल, कानपूर रोड, लखनऊ, उत्तर प्रदेश (उत्तर विभाग), व्द‍ितीय पुरस्कार नॉर्थ सिक्कीम अकॅडमी, नागन, सिक्किम (पूर्व विभाग) तृतीय पुरस्कार राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी, इस्लामपूर, सांगली, महाराष्ट्र (पश्चिम विभाग) हे विजेते ठरले.

स्पर्धेतील प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन संघांना रोख पारितोषिक (प्रथम ला – ₹२१,०००/-, व्दितीयला ₹१६,०००/-, तिसऱ्याला ₹११,०००/-), ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्येक श्रेणीतील उर्वरित स्पर्धक विद्यार्थी बँड संघांना ₹३,०००/- चा सांत्वन पारितोषिक देण्यात आला.

स्पर्धेतील प्रथम विजेत्या बँड संघाला २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्यपथावर आयोजित प्रजासत्ताक पथ संचलनात बँड सादरीकरण करण्याची संधी मिळणाार आहे. इतर दोन विजेते बँड संघांना २९ जानेवारी २०२५ रोजी विजय चौक येथे बीटिंग रिट्रीट समारंभात सादरीकरण दाखविण्याची संधी मिळेल.

या स्पर्धेचे आयोजन २०२३ पासून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यातर्फे संयुक्तपणे करण्यात येते. यामुळे शालेय बँड विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि देशाबद्दल एकतेची, अभिमानाची भावना निर्माण करतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...