पुणे(प्रतिनिधी)
धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील आरोपांसंदर्भात क्लीन चिट मिळाली आहे. त्यांच्यावरील मूळचे आरोप वेगळे असून, त्या प्रकरणाविषयी मी बोललो होतो. मुंडे यांच्यावर ज्यामुळे गंडांतर आले, त्यावर निकाल लागला, तर पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार निश्चित होऊ शकतो. तथापि, मुंडे यांच्या समावेशाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच घेतील, असे राज्याचे अन्नधान्य व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला व भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी लागली. त्या वेळी मुंडे यांना क्लीन चिट मिळाली, तर राजीनाम्या देण्याबाबत आपण विधान केल्याकडे भुजबळांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की कृषी विभागातील खरेदीबाबत मुंडे यांच्यावर आरोप झाले होते. काल न्यायालयाने त्यावर निर्णय दिला आहे. सगळे वैध पद्धतीने झाले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पक्षाला आणि त्यांनाही हा दिलासा आहे. असे आरोप होत असतात. कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात. कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात. मग त्याच्यावर एकच उपाय असतो. तो म्हणजे कोर्टात जाणे. पूर्णपणे त्या आरोपांची छानणी करणे. मात्र, यात काही तथ्य न आढळल्यानेच न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे. राजकारणात, समाजकारणात कधी कधी आमच्याकडून चुका होतात. कधी आमच्या सहकाऱयांकडूनही होतात, असेही त्यांनी नमूद केले.
धनंजय मुंडेना क्लीन चीट मिळाली, तर राजीनामा देऊ, या विधानाची आठवण करून दिली असता भुजबळ संतापले. धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळाली? चला पुढे, काहीतरी विचार करत बसू नका. मुंडे यांच्यावर मूळ आरोप काय आहेत? ते वेगळे आहेत. त्यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात आरोप झाले. त्यांना जी क्लीन चीट मिळाली, ते आरोप कृषी खात्यासंदर्भातील आहेत. मग असे प्रश्न कशाला विचारता? अशा प्रश्नांची उत्तरे देणार नाही. वडाची साल पिंपळाला लावू नका, असेही भुजबळ यांनी सुनावले. धनंजय मुंडे निर्दोष ठरले, तर राजीनामा देऊ, असे ते विधान होते. त्यांच्यावर जे गंडातंर आले,. त्यातून ते क्लिअर झाले, तर विचार निश्चित होऊ शकतो. अर्थात मुंडे यांच्या मंत्रिमंडळाचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छावाच्या काही लोकांकडून चूक झाली आणि मोठी चूक आमच्या लोकांकडून झाली. अध्यक्षांसमोर पत्ते टाकणेही योग्य नव्हते. अध्यक्ष काही रमी खेळत नव्हते. क्रोध आवरला पाहिजे. जे काही असेल, ते सभ्य भाषेत मांडले पाहिजे. संबंधितांना अजितदादा भेटत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.
एका कंत्राटदराने आत्महत्या केली. त्यांची बिले थकीत ठेवली गेली आणि आता लाडक्मया बहिणीकडे पैसे वळवल्याने असे झाल्याचा आरोप केला जात आहे. पण, तसे वाटत नाही. दादांनी याला उत्तर दिले आहे. ताण येत असला, तरी पैसे चुकवले जात आहेत. माझ्या विभागाचे बरेच पैसे या वेळेला पुरवणी मागण्यातून
आले आणि ते चुकवले गेले. असे त्यांनी सांगितले.




