Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनभूमी कदमचा शुक्रवारी अरंगेत्रम् नृत्याविष्कार

भूमी कदमचा शुक्रवारी अरंगेत्रम् नृत्याविष्कार

नाशिक | Nashik
नृत्यसाधना अकाद‌मीच्या संस्थापिका डॉ. संगिता पेठकर यांच्या भरतनाट्यम् विशारद झालेली शिष्या भूमी कदमचा अरंगेत्रम् नृत्याविष्कार शुक्रवार, दिनांक १२ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता कालीदास कला मंदिर येथे होणार आहे. शिवशक्तीवर आधारित तंजावर शैलीत अरंगेत्रम् भूमी सादर करणार आहे.

या नृत्याविष्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, हास्य योग गुरु डॉ. मदन कटारिया व माधुरी कटारिया डॉ. शर्मिला कुलकर्णी, जयश्री राजगोपालन, विदिता मुंगी, दिलीप शिंदे (आयएएस), डॉ. जयंत शेवटकर भरतनाट्यम् नत्यप्रकारात शिक्षण घेतल्यानंतर रंगमंचावर गुरू समोर कला सादर केली जाते त्याला अरंगेत्रम म्हणतात. गुरु त्याच्या शिष्याला जगासमोर आणतो. त्याने इतकी वर्ष घेतलेली मेहनत आणि कला शिष्य सर्वांसमोर सादर करतो, भरतनाट्यमच्या शास्त्रशुद्ध नृत्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नृत्यसाधना भरतनाट्यम अकादमीच्या संस्थापिका डॉ. संगिता पेठकर आणि कदम परिवार यांनी केले आहे.

- Advertisement -

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या