कळवण। प्रतिनिधी Kalwan
पुढची पिढी घडावी यासाठी कळवण एज्युकेशन सोसायटी सारख्या शिक्षण संस्था सुरू राहणे गरजेची आहे.या संस्थेच्या आर के एम विद्यालयातून अनेक मुले घडत आहे. संस्थेतर्फे बांधण्यात येणारी नवी इमारत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयीसुविधांनी सुसज्ज असेल. या इमारतीमुळे संस्थेच्या वैभवात भर पडेल. यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी प्रेरणा मिळेल. या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे. या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख कायम उंचवत राहील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नियोजित शालेय इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी आयोजित स्नेह मेळावा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलतं होते. अध्यक्षस्थानी आ. नितीन पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. भास्कर भगरे, आ. हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, उद्योगपती बेबीलाल संचेती, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार, सरचिटणीस भूषण पगार, डॉ. तुषार शेवाळे, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आदिवासी भागात कळवण एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा पुढे नेत आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मदतीसाठी पुढे यावे. तसेच सामाजिक दायीत्व निधी संस्थेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शैक्षणिक कार्य हे राष्ट्र निर्माणाचे कार्य असून शैक्षणिक संस्थेने कालानुरुप बदल स्वीकारावेत. अलिकडे कृत्रिम बुद्धिमत्ता ही टेक्नॉलॉजी विकसित होत आहे. मुलांनी आणि पालकांनी त्याचं शिक्षण घेतले पाहिजे. विविध प्रकारच्या क्षेत्रात कामगिरी करण्याची गरज आहे. मुलामुलींनी याचा फायदा घेतला पाहिजे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
आमदार नितीन पवार यांनी स्व. ए. टी. पवार हे नेहमीच संस्थेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. संस्थेच्या उन्नतीसाठी त्यांनी सदैव पाठबळ दिले. संस्थेचे आणि आमच्या पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते असून माझे सदैव संस्थेला सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. प्रास्तविकात कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे यांनी संस्थेचा आणि शाळा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडून नियोजित शालेय इमारतीची माहिती दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार नितीन पवार व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. दहावीच्या परीक्षेत कळवण तालुक्यात प्रथम आलेल्या आरकेएमच्या अंकिता जाधवचा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले. कार्यक्रमास माजी खासदार देविदास पिंगळे, नारायण हिरे, मोतीराम गुंजाळ, यतीन पगार, संजय सोनवणे, अर्जुन टिळे, देविदास पवार, बाबुलाल पगार,अॅड परशुराम पगार, अॅड. संजय पवार,अॅड. सुभाष शिंदे, सुधाकर पगार, हेमंत बोरसे, अशोक पवार गजानन सोनजे, रघुवीर महाजन, अरुण पगार, प्रविण संचेती, अँड. दीप सोनवणे, मधुकर पगार, नंदकुमार खैरनार, योगेश महाजन, कारभारी पगार, सतीश कोठावदे, लक्ष्मण खैरनार, मुरलीधर अमृतकार, प्राचार्य डॉ. बी. एस. पगार, मुख्याध्यापक जी. डी. रौदंळ आदींसह शिक्षकवृंद माजी विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.