Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMUHS : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन

MUHS : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन व उद्घाटन रविवार, दि. 01 जुन 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षण आणि संशोधन सुधारण्यासाठी विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ‘चक्र’ (Centre for Health, Applied Knowledge & Research Autonomy) चा प्रारंभ करण्यात येत आहे. ‘हब अ‍ॅण्ड स्पोक’ या धर्तीवरचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे भूमिपुजन व उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

YouTube video player

या कार्यक्रमास प्रति-कुलपती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री, हसन मुश्रीफ, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ, कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरिष महाजन, शालेय शिक्षण विभागाचे दादा भुसे, कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री धिरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

विद्यापीठाचे ’चक्र’ चे भुमिपुजन व उद्घाटन समारंभाचे विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात दुपारी 03.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरीता खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...