नाशिक । प्रतिनिधी | Nashik
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.२५) जिल्हयातील विविध पाणी पुरवठा योजनांचे (Water Supply Scheme) ई-भूमिपूजन (E-Bhoomipujan) करण्यात येणार आहे.
नाशिक (nashik) व झोडगे (ता.मालेगाव) येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) हेही उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी शुक्रवारी (दि.२४) आपल्या दालनात आढावा बैठक (Review meeting) घेतली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे (Department of Maharashtra Life Authority) अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दुपारी २ वा. झोडगे (ता.मालेगांव) येथे पाणी पुरवठा योजना (Water Supply Scheme) भूमिपूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वा. आरोग्य विज्ञान विद्यापीठ सभागृह, दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक येथील कार्यक्रमात जिल्हयातील पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन ते करणार आहे.
सायंकाळी 6.30 वा.जलशुध्दीकरण केंद्र परिसर,घोटी बुद्रुक येथे घोटी बुद्रुक पाणी पुरवठा योजना भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.