Saturday, July 27, 2024
Homeजळगावभुसावळ : लाकडाऊन वाढणार नाही-जिल्हाधिकारी

भुसावळ : लाकडाऊन वाढणार नाही-जिल्हाधिकारी

भुसावळ – Bhusaval

शहरातील लॉकडाऊन वाढणार नसून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तरीही नागरिकांनी मास्क लावून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. ते दि.१३ रोजी येथील प्रांत कार्यालयात आयोजित बैठकित ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी आ.संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपजिल्ह्याधिकारी तथा भूमी संपादन अधिकारी किरण पाटील, डिवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पो.नि.बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे पो.नि.रामकृष्ण कुंभार उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

तसेच लाकडाऊन असल्यामुळे कोरोना संशयीत रूग्णांचा शोध घेऊन त्यांचे तात्काळ स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधीतांचे अहवाल सुद्धा तात्काळ उपलब्ध होत आहेत. अहवाल लवकर प्राप्त होत असल्यामुळे रूग्णांवर उपचार करणे सोपे होत आहे.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना घरी कसे पाठवता येईल आणि रुग्णांची संख्या शून्यावर कशी आणता येईल यासंबंधी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर कमी झालेला असून कोरोनाने बरे होणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या