भुसावळ – Bhusawal – आशिष पाटील
राज्यात बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 35 अंशांवर गेल्यामुळे आसुकच विजेच्या मागणीत वाढ होऊन 23 ते 24 हजार मेगावॅटवर पोहोचली आहे.
यामुळे राज्यातील विजेचा तुटवड्यातही वाढ होत असून 1 मार्च रोजी ती 7 हजार 592 मे.वॅ. इतकी नोंद करण्यात आली. राज्यातील विजेची वाढती मागणी पाहता दीपनगर प्रकल्पातील बंद असलेला संच क्र. 3 हा सुरु करण्यात आला असून तीनही संचांमधून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत आहे.
राज्यात उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे शेती पंपांसह घरगुती व व्यवसाजिक इलेक्ट्रीक साधनांचा वापरही वाढला आहे. त्यामुळे साधारण 16-17 हजार मे.वॅ. असलेल्या विजेच्या मागणीत वाढ होऊन ती सध्या 23 ते 24 हजारांवर येवून ठेपली आहे.
1 मार्च रोजी राज्यात 24 हरि 224 मे.वॅ. मागणी झाली होती. मात्र प्रत्यक्षात निर्मिती मात्र 16 हजार 632 मे.वॅ. इतकी होत असल्यामुळे साधारण 7 हजार 592 मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण झाला होता. ती तुट भरुण काढण्यासाठी एनटीपीसी कडून 7 हजार 747 मे.वॅ. विजेचा पुरवाठा करण्यात आला.
राज्यातील वीज निर्मिती
महाजनकोच्या राज्यातील विज निर्मिती केंद्रांमधून 7 हजार मेगावॅट विज निर्मिती होत होती. त्यात दीपनगर 1078 मे. वॅ., नाशिक 117, कोराडी 1266, खापरखेडा 1062, पारस 179, परळी 654, चंद्रपुर 1953 मे.वॅ. वीजेची निर्मिती करण्यात आली.
दीपनगरात पूर्ण क्षमतेने संच सुरु
एमओडीच्या कारणाने दीपनगर प्रकल्पातील संच क्र. 3 हा मागील लॉकडाऊन पासून बंदच होता. मात्र सध्या वाढत्या विजेच्या मागणीपुळे बंद असलेला संच क्र.3 पुन्हा कार्यान्वित करण्यात अला आहे. प्रकल्पातील संच क्र.3, 4 व 5 असे तीनही संचातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत आहे. त्यातून सोमवारी 1078 मे.वॅ. निर्मिती झाली.
मुबलक कोळसा उपलब्ध
सध्या कोळश्याचे रॅक नियमित उपलब्ध होत असल्यामुळे दीपनगर प्रकल्पात मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील आणखी काही दिवस अडचण निर्माण होण्याची शक्यता नाही. स्थानिक तसेच इंम्पोर्टेड कोळशाचा वापर वीजनिर्मितीत होत असल्यामुळे निर्मितीत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.