Friday, March 28, 2025
Homeजळगावभुसावळ : एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन ; चालकाला मारहाण प्रकरण

भुसावळ : एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन ; चालकाला मारहाण प्रकरण

भुसावळ (प्रतिनिधी) –

येथील एस.टी.बस स्थानकासमोर रिक्षाचालकाने बस चालकाला मारहाण केल्याची घटना दि.५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर एसटी वाहक व चालकांनी मारहाण करणार्‍या रिक्षाचालकास अटक करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी दुपारी चक्काजाम केला.

- Advertisement -

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ आगाराचे चालक आर. एल. पाटील यांनी एसचीचा ब्रेक मारल्याचा राग आल्याने आरोपी रिक्षा चालकाने आर.एल.पाटील यांच्यासह महिला वाहकास मारहाण केली.

ही घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास बस स्थानकाजवळ घडली. घटनेची माहिती कर्मचार्‍यांना मिळताच कर्मचार्‍यांनी सर्व संतप्त होवून आगारात चक्काजाम केला. बस स्थानकावर येणार्‍या जवळपास २० पेक्षा अधिक बसेस बस स्थानकात उभ्या करण्यात आल्या. तसेच आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत चक्काजाम कायम ठेवण्याचा निर्णय कर्मचार्‍यांनी घेतला. यापूर्वीही कर्मचार्‍यांना मारहाण झाल्याच्या घटना झाल्या आहेत.

आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे  त्यांची हिंमत वाढत आहे. या प्रकाराला आ़ळा बसण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी चक्का जाम केला.

दरम्यान, कर्मचार्‍यांनी बसेसचा चक्का जाम केल्यामुळे अनेक प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यास अडचणी आल्या. त्यांन बराच काळ बसस्थानकावर तात्कळत बसावे लागले. तर काहींनी पर्यायी मार्ग निवडत आपला प्रवास केला. दुपारी ४ वजेपर्यंत चक्काजाम सुरुच होता.

याबाबत, चालक आर.ए. पाटील यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

नियमांचे उल्लंघान- बस स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहने लागून नये याबाबत सुचना व नियम असूनही खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. तर काही वेळा अनेक वादही होतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Thailand Earthquake: “पुल कोसळले, इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, अनेक लोक बेपत्ता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiथायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपानंतर एकच हाहाकार उडाल्याचे पहायला मिळाले....