Sunday, May 26, 2024
Homeजळगावभुसावळ ; एकाच रात्री तीन तरूणांची हत्या

भुसावळ ; एकाच रात्री तीन तरूणांची हत्या

भुसावळ । प्रतिनिधी Bhusawal

भुसावळ शहरालगत असलेल्या कंडारी येथे दोघ भावांवर तलवार व चाकूने हल्ला करून दोघांची हत्या केली गेली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना कंडारी ग्रामपंचायतच्या समोर घडली आहे. यात राकेश साळुंखे व शांताराम साळुंखे या दोघा भावांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे गजानन पडघन यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी भुसावळ तळ ठोकून आहेत. दुसर्‍या एका घटनेत पहाटे तीनच्या सुमारास बाजारपेठेतील श्रीराम नगर भागात राहत असलेला निखिल सुरेश राजपूत (वय 35) याची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. निखिल हा पोलीस रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार आहे.

तो श्रीराम नगर भागातील नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर झोपलेला असताना एकाही तरुणाने गळा चिरून त्याची हत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुसावळ शहरात एकाच दिवशी एकाच रात्री तीन खून झाल्याने मोठी खळबळ उडालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या