Wednesday, September 30, 2026
HomeनगरPathardi : भुतेटाकळी फाटा येथे वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई

Pathardi : भुतेटाकळी फाटा येथे वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई

व्यवस्थापक व 16 ग्राहक ताब्यात, मालक फरार || 20 महिलांची सुटका

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने 13 नोव्हेंबरच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे भुतेटाकळी फाटा (पाथर्डी-खरवंडी रोड) येथील हॉटेल अक्षय लॉजिंग व बिअर बार-परमिट रूम समोर पत्र्याच्या खोल्यांवर मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार महिला पोलीस अंजू सानप यांच्या फिर्यादीवरून पथकाने कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वडते यांना पाठवून सापळा रचून छापा टाकला.

- Advertisement -

छापा टाकताच एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. तर व्यवस्थापक इंद्रजित ओमप्रकाश ठाकूर (रा. जामखेड) याला ताब्यात घेतले. श्रीराम राधाकिसन फुंदे (रा. भुतेटाकळी, पाथर्डी) मुख्य मालक हा फरार झाला आहे. येथील रुम क्रमांक 1 ते 6 मध्ये मुंबई (मालवणी), नाशिक, पुणे संभाजीनगर, नांदेड, परभणी दिल्ली (जुनी दिल्ली, नवी दिल्ली) येथील एकूण 20 महिला विविध शहरांमधून आणून ठेवण्यात आल्या होत्या.

गौरव कारंडे, अजित सय्यद, स्वामी नागरगोजे, रोहन धांडे, उलवेद धांडे, मारुती चंदन, अक्षय कदम, प्रशांत पवार, सोपान आंधळे, आप्पासाहेब दौंड, संदीप फटांगडे, आवेज मनियार, संजय खेडकर, सुरज शिंदे, निलेश एडके, विनोद शिंदे (पाथर्डी, जामखेड, बीड, शिरूर) या ग्राहकांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे, सुहास गायकवाड, अक्षयकुमार वडते, महेश रुईकर, सुखदेव धोत्रे, शिवाजी नागरे, संदीप नागरगोजे, अल्ताफ शेख, शितल गुंजाळ, चंद्रावती शिंदे यांनी केली. याप्रकरणी अटक केलेला इंद्रजित ठाकूर याला सोमवारपर्यंत पाथर्डी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी आहे.

ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा...