Friday, November 1, 2024
Homeदेश विदेशBibek Debroy : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त

Bibek Debroy : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त

दिल्ली । Delhi

देशातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

- Advertisement -

बिबेक देबरॉय यांनी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदाचा सप्टेंबरमध्ये राजीनामा दिला होता. संस्थेच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांच्या हकालपट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देबरॉय यांनी कुलपतीपदाचा राजीनामा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बिबेक देबरॉय यांच्या निधनाबाबत पोस्ट शेअर केली आहे. यावेळी मोदींनी लिहिले की, मी डॉ. देबरॉय यांनी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांची अंतर्दृष्टी आणि शैक्षणिक चर्चेदरम्यान त्यांनी हिरिरीने घेतलेला सहभाग माझ्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रांना माझी सहानुभूती. ओम शांती!

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी देखील देबरॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देबरॉय हे एक सैद्धांतिक आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर काम केले आहे. सामान्य लोक जटिल आर्थिक समस्या सहजपणे समजू शकतील असे विशेष कौशल्य त्यांच्याकडे होते, असे रमेश म्हटले आहेत.

१९५५ साली जन्मलेल्या देबरॉय यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर राजधानी दिल्लीतल्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून तसंच ट्रिनिटी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. जागतिकीकरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत धोरणं ठरवताना देबरॉय यांचा सिंहाचा वाटा होता.

नीती आयोगाचे सदस्य राहिलेल्या देबरॉय यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या सूचना अंमलात आणल्यामुळेच भारतीय रेल्वे हा उपक्रम हा जगातल्या सर्वोत्तम अशा सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक होऊ शकला. देशाच्या शाश्वत विकासाला हातभार लागेल या दृष्टिकोनातून विदाकेंद्रित धोरणं आखण्यात त्यांचा हातखंडा होता. देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक साक्षरतेचं महत्त्व कळावं यासाठीही त्यांनी सातत्याने काम केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या