Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजऐन निवडणुकीच्या भरात विरार अन् नालासोपारा भागातून पोलिसांनी जप्त केलं कोट्यावधींच घबाड

ऐन निवडणुकीच्या भरात विरार अन् नालासोपारा भागातून पोलिसांनी जप्त केलं कोट्यावधींच घबाड

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलेलं आहे. मतदान आता अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपले आहे. असे असताना आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी प्रशासन दिवसरात्र काम करत आहे. याच कामातून राज्यभरातून वेगवेगळ्या कायदेशीर कारवायांची माहिती समोर येत आहे. आदर्श आचारसंहिता लागल्यापासून राज्याच्या विविध भागातून कोट्यवधी रुपये आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आता नालासोपारा विधानसभेत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे.

नालासोपारा विधानसभेत विरार आणि नालासोपारा या दोन ठिकाणी करोडो रुपयांची रक्कम घेवून जाणाऱ्या दोन व्हॅन संशयास्पद भरारी पथकाने पकडल्या आहेत. पकडलेल्या दोन्ही व्हॅन या एकाच CMS connecting commerce या कंपनीच्या आहेत. या व्हॅन ATM ची रक्कम घेवून जाणाऱ्या आहेत. असे असले तरी पोलिसांना गाडीमधील पैशांवरुन वेगळाच संशय आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारामधील व्हॅनमध्ये ३ कोटी ५० लाख तर विरारच्या मांडवी याठिकाणी पकडलेल्या व्हॅनमध्ये २ कोटी ८० लाख एवढी रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी या दोन्ही एटीएम व्हॅन नालासोपारा आणि मांडवी पोलीस ठाण्यात नेवून चौकशी सुरु केली आहे. एटीएमच्या गाडीतील रकमेचा हिशोब मिळत नसल्याने पोलिसांकडून पैसे एटीएम की निवडणुकीच्या वापरासाठी आले आहेत? याची चौकशी सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडले ४० लाख
दरम्यान, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातही पोलिसांनी ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. निवडणूक भरारी पथकाने ही ४० लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे. शहरातील सूतगिरणी चौकामधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...