Thursday, September 19, 2024
Homeराजकीयविदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा 'हात' हाती

विदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती

मुंबई । Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करणारे, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिशुपाल पटले (Shishupal Patle) यांनी भाजपाला (BJP) रामराम करत काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला.

शिशुपाल पटले यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेसची (Congress) ताकद आणखीनच वाढणार आहे. शिशुपाल पटले हे भंडारा (Bhandara), गोंदियातील (Gondia) भाजपच्या ताकदवान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी (BJP) मोठा झटका मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha ELection) भाजपला विदर्भात मोठा फटका बसला होता. विदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने १० पैकी ७ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता.

हे हि वाचा : Assembly Election 2024 : बारामतीमधून जय पवार विधानसभेच्या रिंगणात?

खासदारकीनंतर शिशुपाल पटले भाजपाच्या अनेक मोठ्या पदावर कार्यरत होते. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार आपले म्हणणे ऐकत नाही म्हणून त्यांनी भाजपला रामराम केला. शिशुपाल पटले यांच्यामुळे पोवार समाजातील नेतृत्व भाजपानं गमावलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तुमसर विधानसभेतून शिशुपाल पटले यांना मैदानात उतरवणार का? हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

हे हि वाचा : विधानसभेला कर्जत-जामखेडमधून अजितदादा रिंगणात उतरणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या