Thursday, January 8, 2026
Homeनाशिकहेमंत गोडसे यांच्यासमोर मोठं आव्हान; माघारीसाठी अपक्षांच्या दिलजमाईचे मोठे काम

हेमंत गोडसे यांच्यासमोर मोठं आव्हान; माघारीसाठी अपक्षांच्या दिलजमाईचे मोठे काम

नाशिक | Nashik| रविंद्र केडिया
भारतीय जनता पक्षाच्या पक्ष प्रमुखापर्यंतची असलेली कॅडर बांधणी, शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिल्हाभरात असलेली मोठी फौज यांची जोड बांधणी करण्याचे व त्यांना एकत्रित आणून प्रचार यंत्रणा सक्षम करण्याचे मोठे आव्हान हेमंत गोडसे यांच्या समोर राहणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी माघारीपर्यंत अपक्षांची दिलजमाई करण्याचे मोठे काम महायुतीसमोर राहणार आहे.

खा. हेमंत गोडसे यांनी यापूर्वी शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा सरळ सामना हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्याशी झाला होता. त्या लढतीमध्ये एक गठ्ठा हिंदू व मराठी मते हेमंत गोडसे यांना मिळाल्याने निर्विवाद आघाडी ठेवता आली होती.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत भुजबळ त्यांच्यासोबतच असले तरी मराठा मतांमध्ये विभाजन झाल्याचे दिसून येत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संत महंतांची साथ यावेळी होती मात्र आता खुद्द १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज निवडणूक रिंगणात असल्याने हिंदुत्वाची मते विभागण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग करत मराठा उमेदवार दिल्याने त्या ठिकाणीही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

YouTube video player

महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यामध्ये प्रचंड विलंब झाल्यामुळे उमेदवारी मागणाऱ्यांची नावे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनीच पुढे केली होती, त्यामुळे, अप्रत्यक्षरीत्या त्या पक्षांची इच्छा ही जागा लढवण्याची असल्याचे समोर आले. महायुती असताना एकजुटीने प्रयत्न करण्याची अपेक्षा काही प्रमाणात यातून विभागली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपातर्फे इच्छुक असलेले दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छिणारे छगन भुजबळ हे किती सक्षमपणे प्रचार यंत्रणेत सहभाग घेतील याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

सर्वच पक्षांच्या एकत्रितपणे एक संघपणे उरलेल्या १८ दिवसात प्रचार यंत्रणा राबवून विजयाची हॅट्रिक साधणे हेमंत गोडसेंसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाची पक्ष प्रमुखापर्यंतची असलेली कॅडर बांधणी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिल्हाभरात असलेली मोठी फौज यांची जोड बांधणी करण्याचे व त्यांना एकत्रित आणून प्रचारयंत्रणा सक्षम करण्याचे मोठे शिवधनुष्य पेलावे लागणार हे मात्र नक्की.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...