Friday, April 25, 2025
HomeनाशिकShelter Property Expo : राष्ट्र उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे मोठे योगदान - बोमन...

Shelter Property Expo : राष्ट्र उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे मोठे योगदान – बोमन इराणी

शेल्टर प्रदर्शनाचा समारोप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी व प्रगती मध्ये रियल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचे मोठे योगदान आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरांत कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केले.

- Advertisement -

20 ते 25 डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपप्रसंगी इराणी बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते ,क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील,शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश पाटील, सुनिल भायभंग, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, रवी महाजन उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

बोमन इराणी पुढे म्हणाले, प्रत्येकाचे स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्वल भविष्य असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. गेल्या ६ दिवसात १५००० कुटुंबांनी भेट देऊन १०० हून अधिक बुकिंग यात झाले आहे. स्वागत सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी केले. शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी मनोगत व्यक्त केले. मनोज खिंवसरा यांनी आभार मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...