Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी उद्योगांचे मोठे योगदान: राज्यपाल बैस

ग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी उद्योगांचे मोठे योगदान: राज्यपाल बैस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील (Small Medium Enterprise Sector) अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भागात (rural area) असल्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात

या उद्योगांचे योगदान मोठे असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी व्यक्त केले. लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ (SME Chamber of India) या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे (India SME Excellence Awards) वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल बैस बोलत होते. यावेळी यावेळी केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें (Union Minister for Small and Medium Industries Narayan Rane),

एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे उपस्थित होते. यावेळी बोलतांना राज्यपाल बैस यांनी सांगितले कि, लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा (backbone of the economy) असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व मध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) कटिबद्ध आहे.

यावेळी बोलतांना केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणें (Union Minister for Small and Medium Industries Narayan Rane) यांनी सांगितले कि, देशाची प्रगती करायची असेल तर लघू मध्यम उद्योजकांना सक्षम करण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून देशाची प्रगती करण्यासाठी आणि देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब (Manufacturing Hub) करण्यासाठी लघु मध्यम उद्योगांची मोठे योगदान असल्यामुळे त्यांचे प्रश्न तत्परतेने सोडण्यासाठी मी पुढाकार घेऊन संबंधीत शासकीय विभागांमध्ये पाठपुरावा करणार आहे.

भारताच्या विविध राज्यामध्ये खाजगी उद्योग पार्क मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी शासन स्तरावर पॉलिसी निर्माण केली जात असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), डॉ सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता शिक्षण समूह) यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देण्यात आले.

युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना ‘इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएमई चेंबरच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात येऊन चेंबरच्या उद्योजकता विकास केंद्राचा देखील शुभारंभ करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या