Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhava Movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय;...

Chhava Movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय; नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मात्र काहींनी त्यातील एका दृश्यावरून आक्षेप नोंदवला होता. या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. यानंतर या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आज (सोमवार) सकाळी दिली होती. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

यावेळी माध्यमांशी बोलतांना लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) म्हणाले की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे वाचन खूप आहे. त्यांना ऐतिहासिक संदर्भ माहिती आहेत. चित्रपटात (Movie) नेमक्या कोणत्या गोष्टी हव्यात, कोणत्या नकोत, काय बदल केले पाहिजेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले, त्याबद्दल राज साहेबांचे धन्यवाद, असे त्यांनी सांगितले.

तसेच “चित्रपटातील लेझीम नृत्याचे दृश्य आम्ही डिलिट करणार आहोत. राज ठाकरेंनीही मला तोच सल्ला दिला. त्या दृश्यामध्ये (Scene) आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचले नसतील, तर तो सीन आम्ही काढून टाकू. कारण तो चित्रपटाचा काही मोठा भाग नाही. तो एक छोटा भाग आहे. त्यामुळे आम्ही तो सीन डिलिट करू”, असेही लक्ष्मण उतेकर म्हणाले.

आक्षेप नेमकं काय होता?

अभिनेता विकी कौशल ‘छावा’ या हिंदी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत असून चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका गाण्यात छत्रपती संभाजी महाराज यांना नृत्य करताना दाखवण्यात आले आहे. या दृश्यांवर मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर त्वरित हटविण्यात यावा, संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावी आणि शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...