Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाकोहली बनला 'ट्विटर किंग'; गाठला 'इतक्या' फॉलोअर्सचा टप्पा

कोहली बनला ‘ट्विटर किंग’; गाठला ‘इतक्या’ फॉलोअर्सचा टप्पा

मुंबई | Mumbai

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट आशिया कपमध्ये (Asia Cup) पुन्हा तळपल्याने त्याच्यावर टीका करणाऱ्या अनेक टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत. यानंतर आता तो सोशल मीडियातही (Social Media) फॉर्ममध्ये आला असून त्याच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे…

- Advertisement -

सध्या भारतात सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असलेल्या व्यक्तिंच्या यादीत विराट कोहली पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ (PM Narendra Modi) दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. विराट कोहलीचे ट्विटरवर पाच कोटी फॉलोअर्स झाले असून पाच कोटी फॉलोअर्स असणारा जगातील तो पहिला क्रिकेटपटू बनला आहे. तसेच विराटचे इंस्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोअर्सही आहेत. विराटपाठोपाठ सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) ट्विटरवर ३.७ कोटी फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ८ कोटी २० लाख इतकी आहे. तर पंतप्रधानांच्याच पीएमओ या अधिकृत अकाऊंटचेही तब्बल ५ कोटींच्यावर फॉलोअर्स आहेत. तर अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे ४७.९ मिलियन्स तर अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे ४७.९ मिलियन्स इतके फॉलोअर्स आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या