Thursday, May 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! MPSC ची २१ डिसेंबरला होणारी परिक्षा पुढे ढकलली; नवे वेळापत्रक...

मोठी बातमी! MPSC ची २१ डिसेंबरला होणारी परिक्षा पुढे ढकलली; नवे वेळापत्रक आले समोर

मुंबई | Mumbai
एमपीएससीची २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली जाणार की नियोजित वेळेत होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आयोगाने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीमुळे २१ डिसेंबर रोजीची एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अनुक्रमे 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील परिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, अशी माहिती आयोगाने दिली. त्यामुळे, परीक्षार्थी, उमेदवारांनी याची दखल घ्यायला हवी.

- Advertisement -

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी होती. अखेर २१ डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा अध्यक्ष महेश घरबुडे याने सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 2024 कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर 2025 रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचा-यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : हलाला आणि हुंड्याच्या विळख्यात लेक; दोन वेगवेगळ्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik एका बाजूला दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेला पोटावर लाथा मारून तिचा गर्भपात घडवून आणत हलालाच्या नावाखाली विकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आले, तर...