Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारआ. डॉ. सत्यजित तांबे यांचा पक्ष प्रवेशाबाबत मोठा खुलासा..

आ. डॉ. सत्यजित तांबे यांचा पक्ष प्रवेशाबाबत मोठा खुलासा..

शहादा Shahada । ता.प्र.

मी अपक्ष (independent)आहे आणि अपक्षच राहणार असून सरकारी कर्मचार्‍यांच्या जुन्या पेन्शनसाठी मी अतिशय आग्रही आहे. विधान परिषदेमध्ये पहिल्या चर्चेत तो मुद्दाही मांडला आहे. मला खात्री आहे. राज्य सरकार व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस त्यातून चांगला मार्ग काढतील अशी आशा आहे.याप्रश्नी निश्चितच सरकारवर दबाव आणण्याचे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित आ. डॉ. सत्यजित तांबे (Dr. Satyajit Tambe’s)यांनी पत्रकारांना सांगितले.

- Advertisement -

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ. सत्यजित तांबे यांनी नुकतीच शहादा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी भेट देत मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पदविधरांचे व शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे ही आश्वासित केले. गंगोत्री येथे भेट

यावेळी आ.सत्यजित तांबे यांनी शहाद्याचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या गंगोत्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत पाटील,प्राचार्य एस. पी. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नागेश पटेल ,लोकशाही आघाडीचे अजबसिंग गिरासे, अंबालाल पाटील, घनश्याम पाटील तसेच शहादा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सदस्य व लोकशाही आघाडीचे सदस्यांसह,विविध महाविद्यालयातील प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

महाराणा प्रतापसिंह स्मारकास भेट

शहादा शहरातील श्री.क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी आ.सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे आ. सत्यजित तांबे यांच्या सन्मान करण्यात आला.यावेळी शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत, उपाध्यक्ष किशोरसिंग गिरासे, कार्याध्यक्ष कोमलसिंग गिरासे, सचिव गोविंदसिंग गिरासे, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, संचालक देवेंद्रसिंग राजपूत, भटसिंग गिरासे ,अजबसिंग गिरासे ,डॉ.प्रेमसिंग गिरासे, देवेंद्रसिंग गिरासे यासह मराठा महासंघाचे श्याम जाधव, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते विजय कदम,रवींद्र मराठे, राजू माळी ,भिका महाजन सह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या