Saturday, June 29, 2024
Homeनंदुरबारअनलॉकच्या पहिल्याच दिवशी रस्त्यांवर मोठी वर्दळ

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी रस्त्यांवर मोठी वर्दळ

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात करोना रूग्ण कमी झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशान्वये काही निर्बंध घालून सर्व दुकानांना खुले करण्यास परवानगी देण्यात आली.

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी रस्त्यांच्यावर मोठी वर्दळ दिसून आली. तर दोन महिन्यानंतर बस स्थानक गर्दी फुलून गेला होता. असे असले तरी नागरीकांची गर्दी बाबत बेफिकिरपणा दिसून आला. त्यामुळे नागरीकांनी आता स्वयंमशिस्त पाळणे महत्वाचे आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मार्च शेवटच्या आठवडयापासून कोरोना रूग्ण वाढीला सुरूवात झाली. एप्रिल महिन्यात तर कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातला होता. सद्या घडीला नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्ण कमी झाले आहे. राज्य शासनाने राज्यात कोरोना रूग्ण कमी झाल्याने पाच टप्यामध्ये अनलॉक करण्याची घोषणा केली. नंदुरबार जिल्हा अनलॉकचा दुसर्‍या टप्यात आहे. त्यामुळे अनेकबाबींमध्ये जिल्ह्यात सुट देण्यात आली आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यापुर्वी नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी स्थानिक स्तरावर 1 एप्रिलपासून लॉकडाऊन लावत अनेक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर 15 एप्रिलपासून राज्य शासनाने निर्बंध लागू केले त्यामुळे जिल्हावासियांना सलग 62 दिवस निर्बंधांना सामोरे जावे लागले आहे.

सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हदर खाली आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात 1 जूनपासूनच काही निर्बंध स्थितील केले होते. तर दि. 7 जूनपासून जिल्ह्यात अनलॉक केल्याने पुर्ण दुकाने सुरू करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात 62 दिवसानंतर अनलॉक झाला. त्यामुळे नागरीकांनी नंदुरबार शहरात मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. विविध रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. आज पहिल्याच दिवशी बाजारातही चांगलीच गर्दी उसळली होती. कोरोनामुळे दोन महिन्यानंतर जिल्हातंर्गत व लांब पल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नंदुरबार बसस्थानक गर्दीने फुल्लून गेला होता.

सकाळी 7 वाजेपासूनच विविध दुकाने उघडण्यास सुरूवात झाली. शहरात विविध भागात मोठया प्रमाणावर गर्दी दिसून आली. मात्र दुसरीकडे तिसर्‍या लाटेची वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.

सोशल डिस्टंन पाळण्यासह मास्क लावणे अशा नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारचे व्यवहार सुरू झाले असले तरी नागरीकांनी स्वयंशिस्त ठेवणे आवश्यक आहे. आज दिवसभरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या