Wednesday, June 10, 2026
Homeदेश विदेशDGCA ने क्रृ मेंबर्सबाबतचा आपला निर्णय घेतला मागे; तरीही विस्कळीत सेवा पूर्ववत...

DGCA ने क्रृ मेंबर्सबाबतचा आपला निर्णय घेतला मागे; तरीही विस्कळीत सेवा पूर्ववत होण्यासा लागणार वेळ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डीजीसीएने क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. डीजीसीएच्या या निर्णयामुळे आता देशभरातील विमानसेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची सेवा विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे ९०० च्या आसपास उड्डाणे रद्द झाली असून दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबादसह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय आणि गोंधळ निर्माण झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा विस्कळीत झाली आहे. इंडिगो एअरलाइन्सची विमान उड्डाणे रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशभरातील विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांच्या तिकिटाचे पैसे वाया गेले. विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना परत घरी जावे लागले. यामुळे विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. या सर्व घडामोडींनंतर डीजीसीएने मोठा निर्णय घेत सर्व एअरलाइन्सला दिलासा दिला.

- Advertisement -

DGCA चा दिलासादायक निर्णय
नागरी उड्डयन मंत्र्यांनी या परिस्थितीचा आढावा घेत DGCA ला इंडिगोच्या नेटवर्कवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, DGCA ने तातडीने क्रू मेंबर्सच्या ‘साप्ताहिक विश्रांती’चा नियम तात्काळ प्रभावाने शिथिल करून इंडिगोला तात्पुरता दिलासा दिला आहे. “विविध विमान कंपन्यांकडून मिळालेल्या कामकाजातील अडचणी आणि सूचना लक्षात घेता, मागील निर्देश तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत आहेत,” असे डीजीसीएने म्हटले आहे.

डीजीसीएने एक परिपत्रक जारी करून निर्णय मागे घेतल्याबाबत माहिती दिली. यामध्ये डीजीसीएने सांगितले की, ‘अनेक उड्डाणांच्या ऑपरेशनमध्ये सुरू असलेल्या व्यत्ययामुळे आणि विमान कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता ‘साप्ताहिक सुट्टी’चा निर्णय तात्काळ मागे घेण्यात आला आहे.’ डीजीसीएने क्रू मेंबर्सना साप्ताहिक सुट्टीऐवजी रजा वापरण्यास प्रतिबंध करणारा नियम मागे घेतल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. हा नियम तात्काळ लागू झाला आहे.

तथापि, इंडिगोने DGCA ला कळवले आहे की, या रद्द झालेल्या उड्डाणांचा सिलसिला पुढील दोन ते तीन दिवस सुरूच राहील. बुधवारी झालेल्या बैठकीत इंडिगोला १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले कामकाज पूर्णपणे सामान्य आणि स्थिर करण्याची सूट देण्यात आली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना;...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) हे...