Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे...

माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे कडून मोठी अपडेट

मुंबई
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. ई-केवायसीची मुदत संपली आहे. दरम्यान, ई-केवायसीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडिया च्या ‘एक्स’ अकौंट वर मोठी अपडेट दिली आहे त्यात म्हंटले आहे की

- Advertisement -

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.

तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...