Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशरुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण

रुपयाची इतिहासातील सर्वात मोठी घसरण

मुंबई | Mumbai

US फेडर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.७५ टक्क्यांनी वाढ केली आहे. पुढील तीन महिन्यांत आणखी व्याजदर वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे….

- Advertisement -

आज मार्केट सुरू होताच रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होऊन डॉलरचे मूल्य आणखी वाढले आहे. याचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसणार आहे.

झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

रुपया घसरल्याने भारतातील अनेक गोष्टी सणासुदीच्या काळात महाग होतील असा अंदाज वर्तवला जात आहेत. एका डॉलरसाठी आता ८०.२८ रुपये मोजावे लागणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात पेट्रेल-डिझेलचे दर येत्या काळात वाढू शकतात.

नुकसानग्रस्तांसाठी नाशिकला मिळाला ‘इतका’ निधी

दुसरीकडे याचा सगळ्यात मोठा फायदा भारतातील IT सेक्टरला होणार आहे. त्यामुळे शेअर बाजारातील IT कंपन्यांचे शेअर्सही येत्या काळात वधारण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या