Monday, November 25, 2024
Homeदेश विदेशIPS Shivdeep Lande : राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे राजकारणात एंट्री करणार?

IPS Shivdeep Lande : राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे राजकारणात एंट्री करणार?

मुंबई | Mumbai

बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे (Shivdeep Lande) यांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली. शिवदीप लांडे यांनी फेसबुक अकाउंटवरून दिली आहे.

- Advertisement -

मात्र राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिवदीप लांडे हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईत यूपीएससीची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यूपीएससीची परीक्षा दिली आणि २००६ साली ते आयपीएससाठी निवडले गेले. लांडे यांना बिहार केडर मिळाले आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचे २०१४ साली लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही त्यांनी दिला होता. त्यानंतर तीन वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात असताना अमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या