Sunday, April 27, 2025
Homeदेश विदेशKawad Yatra Accident : मोठी दुर्घटना! डीजेच्या तालावर नाचताना ९ जणांचा शॉक...

Kawad Yatra Accident : मोठी दुर्घटना! डीजेच्या तालावर नाचताना ९ जणांचा शॉक लागून मृत्यू

दिल्ली । Delhi

देशभरामध्ये सर्व शिवभक्तांमध्ये कावड यात्रेचा मोठा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी शिवभक्त मिरवणूक काढून जल्लोष साजरा करीत आहेत. (Bihar Kawad Yatra Accident)

- Advertisement -

अशातच बिहारच्या वैशालीमध्ये कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कावड यात्रेत डीजेच्या तालावर नाचत असताना विजेचा शॉक लागून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सुलतानपूर गावात एक ट्रॉली एका हाय-टेंशन लाइनच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. ट्रॉलीवरील सर्व कंवारिया पहेलेजा येथे गंगाजल भरून परतत होते आणि सोनेपूर येथील बाबा हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जात होते.

मृतांमध्ये रवी कुमार, राजा कुमार, नवीन कुमार, अमरेश कुमार, अशोक कुमार, चंदन कुमार, कालू कुमार आणि आशिष कुमार यांचा समावेश आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ वीज कार्यालयाला फोन करण्यात आला मात्र कोणीही फोन उचलला नाही. असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. ११,००० व्होल्टच्या लाईनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन हा घात घडला. सर्व मृतक एकाच गावातील रहिवासी होते. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे .शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे.त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची...