Wednesday, November 20, 2024
Homeदेश विदेशहाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

जेहानाबाद । Jehanabad

श्रावणी सोमवारी बिहारमध्ये (Bihar) मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारमधील जेहानाबाद (jehanabad) जिल्ह्यातील सिद्धेश्वरनाथ (बाबा सिद्धनाथ) मंदिरात सकाळीच चेंगराचेंगरी (Stampede) झाल्याचा प्रकार घडला आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर किमान अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा : श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला कॅबिनेटमध्ये मीच वाचा फोडणार

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हजारो भक्त सिध्दनाथ बाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळीस अचानक मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले अशी जेहानाबाद येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की मंदिराच्या बाहेर फुलं विकणाऱ्या फेरीवाल्याचं भांडण चालू होतं. त्यावेळी लाठीहल्ला केला गेला. त्यातून लोक सैरावैरा धावू लागले आणि ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

हे ही वाचा : हमीपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्रावर ठरणार सरकारी ‘तीर्थदर्शन’

५० ते ६० जण जखमी झाले असावेत. ६ ते ७ जणांचे मृतदेह रुग्णावाहिकांमधून नेण्यात आल्याचं आम्ही पाहिलं. ही धावपळ व चेंगराचेंगरीची घटना घडत असताना इथे पोलीस प्रशासन उपस्थित नव्हतं. असा आरोप प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या