Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्यावणी-नाशिक रस्त्यावर दुचाकी घसरली; दोन ठार, एक जखमी

वणी-नाशिक रस्त्यावर दुचाकी घसरली; दोन ठार, एक जखमी

वणी | वार्ताहर | Vani

- Advertisement -

वणी-नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणा लगतच्या उताराला दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दोन युवकांना आपला प्राण गमवावा लागला तर एक गंभीर जखमी झाला आहे…

भारत किसन चौधरी (३१, रा, कोल्हेर ता. दिंडोरी), मयुर चिंतामण भोये (१८, रा, कोल्हेर ता. दिंडोरी) अशी मयतांची नावे आहेत. विकी भरत धूम (२८ रा. कोल्हेर ता. दिंडोरी) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपघातातील मयत व जखमी हे मोटारसायकल (क्र. एम. एच. १५ सी. एन. ४४२८) वर दिंडोरीहून वणीकडे जात होती. यावेळी त्यांचा कृष्णगाव शिवारात दुचाकी घसरून अपघात झाला.

अनुकंपा नोकरदार ते मनपाच्या शिक्षणाधिकारी; लाचखोर सुनीता धनगरांची ‘अशी’ आहे कारकीर्द

नागरिकांना त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तिघांपैकी भारत व मयुर यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तर तिसरा युवक विकी धूम यांस डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्यास नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनखाली पो. काँ. सोनवणे करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या